पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध हिंडेंबुर्ग हे उमेदवार म्हणून पुढे आले व त्यांस सर्वात अधिक म्हणजे १ कोटि ४६ लक्ष ३९ हजार मतें पडून निर्विवाद बहुमताने ते निवडून आले. मार्चमध्ये जेव्हां पहिली निवडणूक झाली त्या वेळी राष्ट्रीय पक्षातर्फे लुडेंडॉर्फच उमेदवार उभे होते, परंतु त्यांच्या हातून ही निवडणूक निभत नाही असे दिसतांच जर्मन राष्ट्रीय पक्षाने हिंडेंबुर्ग यांस पुढे आणले आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार डॉ. मार्क्स यांच्याहून सुमारें दद्दा लक्ष मतें अधिक पडून जनरल हिंडेंबुर्ग हे जर्मन लोकसत्ताक राष्ट्राच्या अध्यक्षपदावर आरूढ झाले. जर्मनीचा उद्धारकर्ता हिंडेंबुर्ग हे केवळ शिपाईगडी. महायुद्धापूर्वी कर्धीहि त्यांनी राजकारणांत भाग घेतला नव्हता. आणि युद्धसमाप्तीनंतर तर सर्वच व्याप टाकून ते हॅनोव्हर प्रांतांत आपल्या घरी हरि हरि म्हणत बसले होते. त्यांचं वयोमानहि ऐंशीचें घर जवळ जवळ गांठीत आले आहे. इतक्या वृद्धापकाळांत भानगडीच्या राजकारणांत एखाद्या पक्षाचा पुढाकार घेऊन अध्यक्षपदासाठी उमेदवारी करण्याचें एरवीं कोणीहि मनांत आणले नसते. परंतु जर्मन राष्ट्राची इभ्रत राखावयाची असेल तर तुम्हांसच अध्यक्ष झाले पाहिजे अशी राष्ट्रीय पक्षानें त्यांस गळ घातल्यामुळे केवळ राष्ट्रकार्यासाठी म्हणून लोकाग्रहास्तव ते उमेदवार होऊन पुढे आले. उमेदवार होतांनाच त्यांनी असे बजावलें होतें कीं, मी स्वतः या सामन्यांतील यशप्राप्तीसाठी कांहीएक खटाटोप करणार नाही. तथापि 'हिंडेंबुर्ग' या नांवांतच इतकी जादू भरली आहे की, त्यांचे नांव ऐकू येतांच सर्व जर्मनींतील मतदारसंघ स्वयंस्फूर्तीने त्यांस पाठिंबा देण्यास पुढे सरसावला. आणि श्रद्धाळू शेतकरी वर्ग व विशेषतः स्त्री-मतदार यांनी आपली मतें भावनेनें व आत्मस्फूर्तीने हिंडेंबुर्ग यांसच दिल्यानें ते यशस्वी झाले. जनरल हिंडेंबुर्ग हे राजसत्तावादी आहेत. माजी कायसरविषयींची त्यांची निष्टा अद्यापि अढळ आहे. जर्मन राष्ट्राची गेलेली इभ्रत परत मिळवून देऊन त्यास पुनः वैभवशिखरावर आरूढविण्याला एकतंत्री राजसत्ताच प्रस्थापित झाली पाहिजे असे त्यांचें स्वतःचें मत आहे. तथापि ते परिस्थिति जाणतात. आजमितीला जर्म- नींत लोकसत्ता प्रस्थापित झाली असल्याने ती झुगारून देऊन पुनः कायसरशाहीची प्राणप्रतिष्ठा करणे श्रेयस्कर नाहीं, व निदान तूर्त तरी तें शक्य नाहीं हे जाणूनच सध्यांची लोकसत्ताक पद्धति आपण एकनिष्ठेनें चालवूं असे त्यांनी जाहीर केले आहे. तथापि अध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी आपले नांव प्रसिद्ध करतांना त्याबरोबरच आपले राजकीय धोरण म्हणून जर्मन राष्ट्राला जो संदेश त्यांनी कळविला त्यांत ' जर्मनीची नष्ट झालेली इभ्रत मी परत मिळवीन, आणि जर्मनी कांहीं यावच्चंद्रदिवाकरौ गुलामगिरींत राहणार नाहीं' अशी दोन साभिप्राय व स्फूर्तिजनक वाक्य त्यांनी