पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

केसरी पत्राचें धोर= 4 SEP 1996 जिभेला खीळ घालून ठेवीन; लिद्दीन तर 'एकमेका साहाय्य करूं, अवघे धरूं सुपंथ ' अशा दृष्टीनेंच लिखाण लिहीन, नाहीं तर माझी लेखणी मोडून टाकीन, पण तिच्या द्वारें समाजघातक थिल्लर विचार कागदावर रेखाटणार नाहीं, असा आपल्या मनाशींच दृढनिश्चय करावयास नको काय ? राष्ट्रावरील संकटाची जाणीव होतांच 'अयं व्यायामकालः न तु उत्सवकाल: ' असें म्हणून आर्य चाण- क्यानें कौमुदी महोत्सव देखील मना केला आणि आपण त्याच्याहिपेक्षां हीन दशेला नेणारा 'फाल्गुनी उत्सव ' देखील एवढ्या घोर संकटाच्या वेळींहि बंद करीत नाहीं, असें दृश्य दिसून आल्यास भावी पिढी आपणास काय म्हणेल, याचा विचार आपल्या मनांत यावयास नको काय ? असा विचार सर्व सुज्ञ प्रतिनिधींच्या मनांत अवश्य वागत असेलच; मात्र त्यावर माझी एवंढीच सूचना कीं, हा विचार सतत वर्षभर जागृत ठेवावा आणि प्रत्येक लेख लिहितांना व भाषण करतांना आपण जणुं काय परिषदेपुढेंच टराव मांडीत आहों व त्यावर परिषदेतच साधक- बाधक भाषण करीत आहों अशी भावना जागृत ठेवावी. केसरी पत्राचें धोरण 'JAN 1994, (मानपत्राला उत्तर ) लोकमान्य टिळकांनी संस्थेत काम करण्याची संधि मला दिली व तिचा मीं शक्य तितका फायदा घेतला. १९१४ ते १९२० पर्यंत लोकमान्यांचे मार्गदर्शन प्रत्यक्षपणे लाभले. त्या काळांत लोकमान्यांनी होमरुल चळवळ सुरू करून राज- कीय आंदोलन जोरात चालू केले. लोकमान्यांच्या कार्याची सर कोणासच येत नाहीं हें खरें, तथापि त्यांच्या कारावासाच्या काळांत त्यांनी लावलेल्या चळवळीच्या बीजाची आम्ही यथाशक्ति जोपासना महाराष्ट्रांत केली. पुढे ते परत आल्यावर त्या बीजांचे अंकुर जोमानें फोफावले व त्यांचा राष्ट्रीय जीवनावर कसा परिणाम झाला हे सांगण्याची विशेष गरज नाही. अन्यायाचा प्रतिकार हेच केसरीचे बीद लोकमान्यांनी त्या वेळी घालून दिलेला भडा पुढे चालविण्याची जबाबदारी आम्हांवर पडली व त्यांच्या तत्त्वानुरूपच आम्ही यथाशक्ति चळवळी करीत आलो. राजकीय क्षेत्रांत जे मिळेल तेवढे हस्तगत करून घेऊन त्याच्याच जोरावर जास्त मिळविण्यासाठी झगडा चालू ठेवावयाचा हे त्यांच्या कार्याचें सूत्र होतें.

  • श्री. ज. स. करंदीकर यांच्या सन्मानार्थं झालेल्या मानपत्र-समर्पग-सभारंभ-प्रसंगी

त्यांनी उत्तरादाखल केलेल्या भाषणाचा सारांश. केसरी, दि. २ ऑगस्ट १९४६.