पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९२ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध 'असंतोषः श्रियो मूलं' असे राजनीतीचे तत्त्व असल्याने मिळालेले हक समाधानकारक आहेत असे कधींच म्हणावयाचें नाहीं; पण ते टाकून द्यावयाचे असा मात्र त्याचा अर्थ नव्हे. माँटेग्यू सुधारणांचा खर्डा पुढे आला तेव्हा त्यासंबंधी त्यांनी केलेले मार्गदर्शनच अचूक होतें. मिळालेले घालवून टाकणे यांत शहाणपण नाही, तर तें पचवून पाऊल पुढे टाकणे हाच राजकारण यशस्वी करण्याचा मार्ग होय. ज्या ज्या ठिकाणी अन्याय दिसेल त्या त्या ठिकाणी त्याचा प्रतिकार करणें हें केसरीचें ब्रीद आहे व त्या बांबतीत घस सोसण्यास केसरी तयार आहे. कांहीं लोक तत्त्वच्युतीचा आमच्यावर आरोप करतात आणि हिंदुसभेचें हें पत्र झाले असे म्हणतात, पण तें बरोबर नाही. कोणत्याहि एका पक्षाचें हें मुखपत्र नाहीं. ज्यांच्यावर संकटें कोसळ- तात त्यांची बाजू जोरदारपणें पुढे मांडणें हेंच केसरीचें ध्येय होय. या कामी जात व पक्षभेद केसरी मानीत नाहीं हें सर्वांनी लक्षांत घेतले पाहिजे. आज हिंदु समाजावर संकट कोसळल्यानें केसरींतून हिंदूंची बाजू मांडण्यांत येते तेव्हां यांत तत्त्वच्युति नाहीं. 4 लोकपक्षाची बाजू सरकारपुढे निर्भयपणे पुढे मांडीत असतां केसरीवर अनेक वेळा संकटें ओढवलीं. सिडनहॅमच्या कारकीर्दीत निष्कारण पांच हजारांचा जामीन मागण्यांत आला. त्यानंतरहि अनेक वेळां सरकारशी खटके उडाले, पण त्या सर्वोतून केसरी यशस्वीपणे बाहेर पडला. हायकोर्टाच्या अब्रूनुकसानीचा खटला तेवढा आंगलट आला; पण त्या खटल्यामुळेच कोर्टाच्या बेअदबीच्या कल- मांत फरक करावा लागला, ही इष्टापत्तीच होय. सोलापूरच्या मार्शल लॉच्या प्रसंगानेंहि अनेक भानगडी उद्भवल्या, पण केसरी केव्हांहि आपले कर्तव्य करण्यास डगमगला नाहीं. राष्ट्रोत्कर्षाला उपयुक्त अशा विधायक कार्यास प्रोत्साहन पुण्याच्या गोळीबाराचें प्रकरण अगदी ताजेंच आहे. ती हकीकत प्रसिद्ध करूं नये व चौकशी-समिति नेमूं नये असा प्रतिबंध असतां आम्ही चौकशी करून जी बाजू मांडली त्यामुळे गोळीबारांत जे बळी पडले त्यांच्या कुटुंबियांस सरकार- कडून नुकसानभरपाई मिळाली. याशिवाय राष्ट्राच्या उत्कर्षाला कारणीभूत अशा नवीन नवीन विधायक कार्याचा पुरस्कार करणें हें ध्येयहि केसरी कधी विसरला नाहीं. असो; या संस्थेत मला काम करण्याची संधि श्री. केळकर यांनी दिली व त्यांच्याहि मार्गदर्शनाचा लोकमान्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे फायदा मिळाल्या. मुळे मला थोडेबहुत जें कार्य करता आले ते आपण सर्वांनी गोड मानून घेतलें माबद्दल मला कृतज्ञता वाटते. आपण बहुसंख्येने उपस्थित राहून माझा जो गौरव केला ग्राबद्दल सर्वोचें मी अंतःकरणपूर्वक आभार मानतो. - समाप्त -