पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९० श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध की, वाढायला आणलेला जिन्नस कळकला असला तरी केवळ ज्या भांड्यांतून तो वाढायला आणला त्या भांड्याच्या घाटाचें कौतुक करण्याइतकें महत्त्व त्या घाटाला असतें ! भाषा ही नुसती अर्थाची वाहक आहे. तो अर्थच जर अनर्थकारक असेल तर नुसत्या भाषेचें कौतुक कसले ? पण तसा फरक करून लेखांतली विधानें मान्य नसतां, नुसत्या भाषाशैलीचें कौतुक करून मिटक्या मारणारे कांहीं आंबटशो की असतात व त्यामुळे वाचकवर्गाला अनिष्ट वळण लागतें, म्हणून हा इशारा देणें भावश्यक वाटलें. 'कलेसाठी कला' हे तत्त्व मान्य केलें कीं, वर दर्शविलेली विसंगतता गळ्यांत पडते; यास्तव मुळांतच ते तत्त्व खोडून टाकले पाहिजे. अंतिम मूल्याला तेवढे बंधन नसतें 'कलेसाठी कला' या कल्पनेंतील हेत्वाभास दुसऱ्यादि एका रीतीने व्यक्त करतां येतो. जेथें कार्यकारणभावाची परंपरा खुंटते तेथे आपण सामुळे पुढील प्रश्न थांबविण्यासाठी असले उत्तर देतो. घर कोणी केलें, मनुष्यानें; मनुष्य कोणीं निर्माण केला, सृष्टीनें; सृष्टी कोणी केली, ईश्वरानें; ईश्वर कोणी केला, परमेश्वरानें; परमेश्वर कोणी केला, परमेश्वरानें ! कारण तेथें मति खुंटली. याच न्यायानें ब्रह्मा- नंद कशासाठी, ब्रह्मानंदासाठी; मोक्ष कशासाठी तर मोक्षासाठी इत्यादि अनन्वयी उत्तरें देण्यांत येतात, कारण त्याच्या पलीकडे मतीची गति जाऊं शकत नाहीं. यावरून हे लक्षांत येईल की, कलेसाठी कला, शास्त्रासाठी शास्त्र, सुधारणेसाठी सुधारणा असली उत्तरें खरी ठरण्याला कला, शास्त्र, सुधारणा या कल्पना मोक्ष, ब्रह्मानंद किंवा परमेश्वर यांच्यासारख्या अंतिम मूल्याच्या योग्यतेच्या असल्या पाहिजेत, पण त्या तशा नाहींत हे आपण व्यवहारावरून जाणतों. कला, शास्त्र, सुधारणा यांच्यापलीकडे मनुष्यबुद्धीला गम्य अशीं अंतिम मूल्यें असतात आणि आहेत म्हणूनच 'कलेसाठी कला' हें उत्तर जाणूनबुजून आडरानांत शिरण्या- सारखे आडमुठेपणाचें वाटते. कलेपेक्षा नीतीचें अंतिम मूल्य अधिक म्हणून कलेला • नीतीचे बंधन अवश्य पाळावे लागतें आणि नीतीला देखील जगत्कल्याणाचें बंधन पाळावे लागते. अर्थातच अंतिम मूल्याच्या दृष्टीने ज्याची पायरी जितकी खालची तितकी त्याला बंधनें अधिक असणारच. यास्तव पत्रकारांनी आपली पायरी आणि आपले अंतिम साध्य ओळखून स्वतःवरची नैतिक बंधने पाळली पाहिजेत. मनांत दृढनिश्चय करा याचा आपण सर्व सुज्ञ पत्रकार बंधूंनी विचार करून आपली सर्व साधनें समाजाच्या व राष्ट्राच्या उत्कर्षासाठींच मी उपयोगांत आणीन, वैयक्तिक भांडणांत आणि उखाळ्यापाखाळ्या काढण्यांत माझ्या बुद्धीचा अपव्यय करून मी राष्ट्राची साधनसंपत्ति व्यर्थ नष्ट करण्याचें पाप करणार नाही, बोलेन तर राष्ट्राच्या अभ्युदयाचा मार्ग सांगणारें वाक्यच बोलेन, नाहीं तर माझ्या