पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अ. भा. मराठी पत्रकार Sund पुढाऱ्यांचा कल नवप्रयोगविन्मुख असतो. नदुप्रयोगोत्सुक लोक आपल्याला पुरोगामी म्हणवितात व तो शब्द कानाला गोड लागतो खरा. प्रयोगानें समाजाची खरीच प्रगति झाली आहे असे निचित दाखवून अनुभव क्वचितच येतो. यास्तव असा निश्चित अनुभव पयत आपण नव्या प्रयोगांविषयी साशंकच राहिले पाहिजे. मग त्यामुळे आपण 'प्रतिगामी' मानलें गेलों तरी हरकत नाहीं. प्रतिगामीचा पुरोगामी होण्याला वेळ लागत नाहीं. परंतु : नवीन देण्यासारखी पुरोगामी होऊन त्या प्रयोगांत अपयश आल्यास पश्चात्ताप पाडून पुनष पूर्वस्थळावर येण्यांत मात्र आपत्ति व अडचणी विशेष असतात. JAN बर्तमानपत्रावर नैतिक व राष्ट्रीय बंधन ‘ कलेसाठी कला' की ' जीवनासाठी कला' असा एक वाद निघाला आहे. कलेसाठी कला, शास्त्रासाठी शास्त्र असें म्हणणारा इसम देखील 'वर्तमानपत्रासाठी वर्तमानपत्र', असे म्हणण्याचें धाडस जोपर्यंत करीत नाहीं, तोपर्यंत वर्तमानपत्रे हीं समाजकार्यासाठी, राष्ट्रकार्यासाठी आहेत असेंच तत्त्व सर्वमान्य आहे, असें मी समजून चालतों. अर्थातच वर्तमानपत्रे ही राष्ट्राच्या व समाजाच्या उत्कर्षासाठी आहेत, असे मान्य केल्यावर वर्तमानपत्रांवर नैतिक व राष्ट्रीय बंधन आलेच. जेणेकरून नीतीला धक्का बसेल, अनीतीला प्रोत्साहन मिळेल, राष्ट्रीयत्वाचा लोप होऊं लागेल अशी शिकवण वर्तमानपत्रानें देऊं नये हे ओघानेंच प्राप्त झालें. · नुसत्या भाषेचें कौतुक कसलें ? 6 , 'वर्तमानपत्रांसाठी वर्तमानपत्र' असे आपण म्हणूं शकत नाहीं; आणि वर्तमानपत्र चांगले चालविणे ही एक कलाच आहे; तेव्हां यांत 'कलेसाठीं कला हें म्हणणें कोठें शिल्लक राहिलें? आणि मग वर्तमानपत्र चालविण्याच्या कलेला जर बंधन आलें तर इतर कला तरी बंधनाच्या पलीकडे कशा राहूं शकतील १ चोरानें भिंतीला भोक पाडून घरांतलें गांठोडें लांबविलें हें दिसत असतो गांठोडे गेलें याची दखलगिरी न घेतां भिंतीला पाडलेल्या भोकाच्या सुबकतेची तारीफ करणारा एखादा 'चारुदत्त' असूं शकेल, पण इतर कोणीहि व्यवहारज्ञ ज्या भोकांतून घरांतलें सर्वस्व बाहेर गेले त्या भोकाची केवळ कलेच्या नांवानें प्रशंसा करीत बसणार नाहीं. वर्तमानपत्राचे कित्येक बाचक चारुदत्ताच्या वर्गातले असतात. म्हणून हा इशारा देण्याची जरूरी भासत आहे. वर्तमानपत्रांत काय लिहिले आहे याच्याकडे लक्ष न देतां केवळ कसे लिहिले आहे याचीच वाखाणणी करणारे कांहीं हरीचे लाल असतात. तुम्हांला यांत लिहिलेली मतें आणि केलेली विधानें संमत आहेत काय ! असे विचारले असतां ते सरळ सांगतील की, त्यांतली मतें आम्हांला साफ नापसंत आहेत, पण लिहिण्याच्या शैलीचें आम्ही कौतुक करतों ! याचा अर्थ