पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८८ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध पहिला नवप्रयोगोत्सुक असतो. दुसरा जुन्या प्रयोगांवर श्रद्धा ठेवणारा असतो. हल्ह्रीं जे पुरोगामी व प्रतिगामी असे शब्द वारंवार ऐकूं येतात त्या शब्दांतला गर्भितार्थ वर दर्शविल्याप्रमाणे आहे. अर्थातच शब्दानें मनांतला अभिप्राय यथार्थतेनें व्यक्त करावयाचा असल्यास, पुरोगामीच्या ऐवजी 'नवप्रयोगोत्सुक आणि प्रतिगामीच्या ऐवजी 'नवप्रयोगानुत्सुक' असे शब्द वापरावयास हवेत. पण ज्यांना केवळ शाब्दिक मोठेपणाच घ्यावयाचा आहे, ते जसे स्वतःस प्रतापराव, अच्युतराव इत्यादि वाटेल ती भपकेदार नांवें घेतात आणि मग पर्यायाने इतरांच्या- कडे, त्यांच्या गौणत्वदर्शक नांवावरून, सापेक्षतेनें आपोआपच लघुत्व येतें, तसाच प्रकार या नांवासंबंधानेंहि झाला आहे. कांही साहित्तिकांना आपण कांहीं तरी अद्भुत व लोकविलक्षण कर्तबगारी करतो आहों असा अहंकार वाटूं लागून, त्यांनी स्वतःला पुरोगामी हें नांव घेतले आणि जे कोणी आपल्या पंथांतले नव्हेत असे त्यांना वाटले त्यांना त्यांनी स्वमतानें प्रतिगामी ठरविलें ! असो. या सर्व चिकित्सेचा निष्कर्ष हाच की, समाजांतले कांहीं पुढारी समाजाची सुधारणा करण्यासाठी कांही नवे नवे प्रयोग करून पाहावे अशाविषयी उत्सुक असतात, तर दुसऱ्या कित्येकांच्या अंगीं पूर्वेतिहास वाचून व पूर्वानुभव लक्षांत घेऊन, ही उत्सुकता राहिलेली नसते. नव्या कल्पना हितकारक ठरल्या पाहिजेतना ? प्रज्ञा शब्दाचें लक्षणच नवीन नवीन कल्पना सुचणं हैं असल्यानें प्रज्ञा- वंताला नव्या कल्पना सुचाव्या व त्याचा त्यानें उपयोग करावा हे स्वाभाविकच आहे आणि अशा प्रज्ञेच्या तरतमभावावरूनच समाजांत श्रेष्ठ-कनिष्ठपणा ठरत असतो. परंतु अशा कल्पनातरंगांचा उपयोग काव्यसृष्टीत कितीहि होत असला तरी प्रत्यक्ष सृष्टीतील गूढ प्रश्न उकलण्यास तिचा उपयोग थोडाच होऊं शकतो ? हीं गूढे अकलण्याचा प्रयत्न अनेक शास्त्रज्ञांनी पूर्वी केला आहे. त्यांच्या प्रयोगांनी सिद्ध झालेली प्रमेयें गृहीत धरूनच आपण सर्व व्यवहार करतों. तोच न्याय समाजविषयक प्रयोगांनाहि लागूं आहे. समाज सुखी कसा होईल, समाजांत शांतता कशी नांदेल, समाजाची उन्नति कशानें होईल, या संबंधांत दूरदृष्टीच्या अनेक तज्ज्ञांनी अनेक प्रयोग करून व अनुभव घेऊन नियम घालून दिले आहेत. ते नियम झिडकारून नवीन प्रयोगांनों नवीन नियम शोधून काढ- ण्याची आणि ते नवे नियम समाजाला अधिक कल्याणकारक होतील असें पटवून देण्याची महत्त्वाकांक्षा बाळगण्याची कल्पना कितीहि आकर्षक असली तरी ती यशस्वी ठरणें तितकेंसें सुलभ नाहीं. यास्तव सामान्य जनांनी उगाच गूढ गोष्टींत नवे नवे प्रयोग करून पाहण्यांत आणि ते प्रयोग अयशस्वी झाल्यास समाजाची तितकी हानि करण्यांत हंशील नाहीं. यास्तव सामान्यतः समाजांतील