पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अ. भा. मराठी पत्रकार परिषद, मुंबई २८७ समाजाच्या उत्कर्षाचे किंवा अपकर्षाचे मार्ग मुंबई साताऱ्याच्या मार्गाइतके उघड उघड परस्पर विरुद्ध दिसणारे व हट्टी माणसाचीहि खात्री करून देणारे असे नस- तात. समाजसुधारणेचे मार्ग इतके अनिश्चित व गुंतागुंतीचे असतात की, त्यांना मुंबई सातायाच्या आगगाडीच्या मार्गाची उपमा लागूं पडण्यासारखी नसून, चक्रव्यूहांतील मार्गाचीच उपमा लागूं पडेल. चक्रव्यूहांत सांपडलेला मनुष्य जसा भांबावून जातो आणि त्याला आपण चाललो आहों त्या मार्गाने गेल्यास आपण बाहेर पडूं, कां घाण्याच्या बैलाप्रमाणे पुनश्च निघालेल्या जागीं येऊं याची खात्री नसते; त्याप्रमाणेच बहुतेक सर्व सुधारणावादी लोकांची स्थिति असते. हेतूबद्दल वाद नसतोच; हेतु सर्वांचा एकच व तोहि चांगला प्रशं- संनीयच असतो. मात्र वाटा वेगवेगळ्या आणि परस्परविरुद्ध दिशेनें जात असलेल्या दिसतात. अशा परिस्थितींत जो अगदींच अज्ञ असतो तो दुसऱ्याला विचारून जपून जपून पाऊल टाकीत असतो आणि जगांतल्या बहुतेक लोकांचा भरणा याच वर्गात होतो. जो खरा तज्ज्ञ असतो त्याला शंकेचें कारणच नसतें, पण असे तज्ज्ञ समाजांत क्वचितच आढळतात. खरी अडचण येऊन पडते 'ज्ञानलवदुर्विदग्धांची'. स्वतःला तर मार्ग निश्चितपणें ठाऊक नसतो, पण स्वतःच्या ज्ञानाची घमेंड वाटत असल्यामुळे दुसऱ्यांचा सल्ला ऐकावयाचा नाही आणि रुळलेल्या मार्गाने जावयाचें नाहीं, असाच त्यांचा खाक्या असतो आणि अशा माणसांतच पुरोगामी का प्रतिगामी असला वाद उद्भवून जो तो स्वतः आपण खऱ्या मार्गावर आहोत असे मानून, दुसऱ्या मार्गाने जाणान्याला प्रतिगामी समजून, त्याची हेटाळणी करीत असतो. वास्तविक पाहतां समाजाची सुधारणा करून उन्नतीचा बिंदु गांठावयाची महत्त्वाकांक्षा सर्वांच्याच मनांत असते आणि सर्वच त्या उन्नतीच्या बिंदूकडे म्हणून चालले असल्यामुळे सर्वच आपल्या दृष्टीने 'पुरोगामी' होत. तथापि आंकड्यांचें कोडें सोडविण्याचे मार्ग जसे अनेक असतात, जसे चक्रव्यूहांतून बाहेर पडण्याचे मार्गहि अनेक असूं शकतात; तसेच समाजोन्नतीचा बिंदु गांठण्याचेहि मार्ग अनेक असूं शकतील; या बुद्धीनें आणि रुळलेल्या मार्गाने जाण्यास कंटाळल्याने अथवा त्यांत स्वतःच्या बुद्धीला कमीपणा आहे असे वाट.. ल्यानें कांही धाडसी माणसे दुसऱ्या मार्गानें जाऊन सुधारणेचें शिखर गांठू इच्छितात. इतरांना हा खटाटोप व्यर्थ कष्टप्रद वाटतो, कारण त्यांच्या मनाची अशी खात्री असते कीं, पूर्वी अनेकांनी अनेक मार्गाचे निरीक्षण करून त्या सर्वांत जो सुखकर व सुलभ वाटला तो मार्ग सांगून ठेवला; आणि आतां पुनश्च प्रयोग करून तरी तोच निष्कर्ष निघणारना ? मग हे व्यर्थ जलताडण कशास करीत बसा. रुळलेल्या मार्गानें गेलेलें काय वाईट ! प्रयोगोत्सुक का प्रयोगानुत्सुक समाजाच्या नेत्यांत वर दर्शविल्याप्रमाणे दोन वर्ग असतात. त्यांतला