पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८६ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध कळकळ ओतप्रोत भरलेली दिसली पाहिजे. 'आत्मस्तुति परनिंदा मिथ्या भाषण कधीं न यो वदना' हें साधुवचन यथोचित व मान्यच आहे. त्यांस अनुसरून पत्रकाराच्या लेखणीतून कधींहि 'आत्मस्तुति' व 'परनिंदा' लिहिली जाऊं नये देंहि त्रिवार सत्य होय. पण आत्मस्तुति कागदावर लिहिली न गेली, तरी मनांतहि ती वागत असूं नये असें कांहीं शास्त्रकार सांगत नाहींत. किंबहुना आत्मप्रत्यया- विना कोणतेंहि महत्कार्य होत नाहीं हें सर्वश्रुतच आहे आणि असा आत्मप्रत्यय वाटण्यांत आत्मस्तुतीचें बीज असणे आवश्यकच आहे. इतरांहूनहि आपण कांहीं तरी वेगळें सांगूं शकतों आणि वेगळे सांगण्याचा संभव नसेल तेव्हां इतर जें सांगतात तेच सांगावयाचें झालें, तरी तें आपण इतरांहून अधिक चांगल्या रीतीनें, अधिक प्रभावी भाषेनें, अधिक परिणामकारक रीतीने सांगू शकतों, असा ज्याला आत्मविश्वास वाटत नसेल त्यानें लोकशिक्षणाच्या या कंटकावृत मार्गात पाऊल तरी कशाला ठेवावें ! वीराला ' मीच कुस्ती जिंकणार' असा अहंकार वाटणें हैं ज क्षम्य, तसेच पत्रकाराला 'मीच फड जिंकणार असा अहंकार मनांतून वाटणें देंहि क्षम्यच आहे. पण तो अहंकार स्वतःच्या शब्दानें व्यक्त न होतां तो वाच- कांच्या तोंडून पर्यायानें व्यक्त होईल अशा कृतीनें तो बाहेर उमटला पाहिजे. इंग्लंडचा सुप्रसिद्ध पुढारी थोरला पिट म्हणत असे की, 'मीच एकटा इंग्लंडला वाचवूं शकेन; इतर कोणाची तें कार्य करण्याची शामत नाहीं.' ही त्याची अहं- काराची वृत्ति त्याच्या प्रत्यक्ष कृतीनंतर त्याला शोभू लागली. वृत्तपत्रकारानेंहि ' मीच काय तो देशाचा उद्धार करूं शकेन' अशी ईर्षा मनांत बाळगावी, परंतु ती ईर्षा साधार का निराधार हें इतरांनी अनुभवांतीं ठरवावयाचें असतें, स्वतः पत्रकारानें बोलावयाचे नसते. , ध्येयसिद्धांचे मार्ग वेगवेगळे स्वतंत्र देशांत तर 'सुधारणा' हेच ध्येय साहित्यिकांच्या डोळ्यापुढे असणार. समाज सुधारावा म्हणूनच कोणाचेहि कोणतेहि प्रयत्न चालू असणार. समाज बिघ डावा, अधोगतीला जावा, म्हणून मी अमुक एक गोष्ट करीत आहे, असे कोणता शहाणा मनुष्य म्हणेल? अर्थातच कोणी झाला तरी आपला हेतु चांगलाच आहे, वाईट अथवा दुष्ट नाहीं असेंच सांगणार. तथापि हेतु चांगला असला, तरी त्याच्या सिद्धीचा मार्ग नेहमीं बरोबरच असतो असे नाहीं. पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी निघालेला एखादा अडाणी मनुष्य चुकून साताऱ्याच्या गाडींत बसत नाहीं असें नाही. त्याला विचारले असतां तोहि मी मुंबईला निघालों आहे असेच म्हणेल; पण ज्या गाडीनें तो जात आहे ती गाडी मुंबईला जात नाहीं याचें ज्ञान त्यास नसेल. तें ज्ञान करून दिल्यास तो ती गाडी सोडून मुंबईला जाणाच्या गाडींत येऊन बसेल. तो कांहीं हट्टानें मी याच गाडींत बसेन असा आग्रह धरणार नाही. परंतु