पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अ. भा. मराठी पत्रकार परिषद, मुंबई २८५ तथापि तेवढ्यानें विशिष्ट पक्षाची सर्वच मतें जशीच्या तशी मान्य केली पाहिजेत असे नव्हें. ध्येय मान्य असले, तरी साधनाविषयों मतभेद असूं शकतो आणि पत्र- कारांनी साधनांची योग्यायोग्यता परिस्थितीप्रमाणे ठरवावी लागते. याकरितां माझें तर मत असे आहे की, पत्रकाराला आपल्या मतस्वातंत्र्याची आणि कर्तृ- त्वाची चाड असेल, तर त्यानं कोठल्याहि एका विशिष्ट पक्षाला आपल्याला काय मचे बांधून घेऊ नये; ज्या कोणत्या पक्षाची मते आपल्याला पटतील, त्याची वकिली त्याने एकनिष्ठेने करावी. तथापि आपली भूमिका केवळ वकिलाची न मानतां न्यायाधिशाची भूमिका घेण्याची भावना जागृत ठेवावी. पक्षाचा मिंधेपणा नसावा विशिष्ट पक्षाची अथवा पंथाची संघटना होत असते तोपर्यंत त्या पक्षाला आपल्या बाजूचें समर्थन करणाऱ्या पत्राची गरज भासत असते आणि ते कार्य साधण्याकरितां ते पत्रकाराशी मिळते घेतात. एवढेच नव्हे, तर त्यांचे आर्जवहि करतात; परंतु एकदां पक्ष स्थिर झाला व बळावला म्हणजे त्या पक्षांतील नवे चालक जुन्या प्रारंभीच्या अडचणी विसरून जातात आणि मग आपल्यातर्फे वकिली करणाऱ्या पत्रकारावरच कुर्रघोडी करूं पाहतात. पत्रकार जर त्या पक्षाचा मिंधा बनला असेल, तर त्याला अशा परिस्थितीत आपले स्वातंत्र्य गमावून आणि सदसद्विवेकबुद्धि बाजूस सारून, पक्षाच्या मनोदयानुरूप त्याची तरफदारी करावी लागते. विलायतेंत भांडवलशाहीच्या जोरावर प्रत्रकारांना अशा रीतीने खाकोटीस मारतां येतं. इकडे भांडवलशाहीचा तितका वरचष्मा अद्यापि झाला नसला, तरी पक्षाच्या वाढत्या बळावर असला जुलूम चालू होतो. यास्तव ज्याला मिंधेपणा पत्करावयाचा नसेल, त्यानें आधीपासूनच कोणत्याहि पक्षाच्या आधीन न होतां आपला स्वतंत्र बाणा राखण्याची दक्षता घेतली पाहिजे. पत्रकाराचा कोणत्याहि पक्षाशी साक्षात् संबंध नसला, तरी त्याची मतें कोणत्याना कोणत्या तरी पक्षाशी मिळती असणारच, आणि तेवढ्या दृष्टीनें तो अमुक पक्षाचा असा गणला जाईल; तथापि घुणाक्षर न्यायानें असें मतैक्य दिसणें वेगळं आणि मतैक्याविषयीं वचनबद्ध असणे वेगळे अगाऊ वचनबद्ध होऊन आपले मतस्वातंत्र्य आपल्याच हातानें घालवूं नये, एवढाच त्यांतला मुख्य मुद्दा आहे. अशा रीतीने आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्याकरितां पत्रकाराने आपल्या पत्रांत शक्य तितकें विषयवैचित्र्य साधले पाहिजे. म्हणजे पत्राचें वैशिष्टय राहते, वाचकांवर त्याची छाप पडते आणि कोणत्याहि पक्षाच्या दडपशाहीस बळी पड- ण्याचा प्रसंग येत नाहीं. ध्येयवादित्व व आत्मविश्वास पत्रकार स्वतः ध्येयवादी असून त्याच्या नसानसांतून त्याची कार्यनिष्टा व