पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८४ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध अ. भा. मराठी पत्रकार परिषद, मुंबई ( श्री. ज. स. करंदीकर, संपादक केसरी, यांचे अध्यक्षीय भाषण ) प्रिय प्रतिनिधि बन्धूंनो, वकिलींतील तन्मयता आपण पत्रकार आपापल्या पक्षाची, मतप्रणालीची, ध्येयाची वकिलीच करीत असतो. परंतु अशीलांची उसनी भांडणे कोटीत भांडणाऱ्या वकिलांच्या- सारखी आमची वकिली अगदीच तकलुपी व वरकरणी नसते. आपण आपल्या अंगीकृत कार्याशी इतकें समरस व एकजीव होऊन जातों कीं, वकिलांना जसा कोर्टातला गाऊन कोर्टातच काढून ठेवून मोकळे होतां येतें, त्याप्रमाणे संपादकांना संपादकाच्या खोलीतली मतें खोलीतच ठेवून बाहेर वेगळेपणानें वावरतां येत नाही. आपण आपल्या मताशी प्रतारणा करीत नाहीं हा आपला दोष नसून तो गुणच आहे असे मी मानतो; आणि ज्यांच्यांत इतकी तन्मयता बाणली नसेल त्यांनी ती आपल्या अंगी बाणून घ्यावी असेच मी म्हणेन. तथापि या गुणांतूनच एका अवगुणाचा उगम होतो व तेवढ्याकरितांच या विषयाचा मी ऊहापोह करीत आहे. आपल्या तत्त्वाशीं, मताशीं व पक्षाशी एकनिष्ठ राहणं याचाच अर्थ इतरांशी वितुष्ट येणे असा होऊं लागतो व त्या दोषाचे कोणीहि समंजस माणूस समर्थन करूं शकणार नाहीं. भक्ताने आपल्या आराध्यदेवतेविषयीं कितीहि पूज्यभाव ठेवला, तरी इतरांच्या देवतांची टवाळी केल्याशिवाय तो खरा एकनिष्ठ भक्त नव्हे, असे मानणें असमंजसपणाचेंच ठरणार आहे. परंतु कोणाहि पत्रकाराच्या मताविषयी तत्पक्षीयाकडून भलेबुरे मत प्रकट करतांना, विरुद्ध पक्षा- विषयी त्याच्या हातून किती असहिष्णुता प्रकट केली जाते याचीच कसोटी सर्वांच्या आधीं लावली जाते, हैं बरें नव्हे, एवढेच सुचविण्याचा माझा उद्देश आहे. पत्रकार हेहि एक प्रकारे वकीलच आहेत आणि त्यांना जन्मभर जनतेची वकिली करावयाची असते. ही वकिली चोख करावयाची झाल्यास जनतेच्या मुख दुःखांशी आणि आकांक्षांशी पत्रकारांनी तन्मय झालेच पाहिजे, याशिवाय त्यांना आपले कर्तव्य उत्तम रीतीने पार पाडतां येणार नाहीं. परंतु जनतेच्या सुख- दुःखांशी व आकांक्षांशी तन्मय होणे म्हणजे जनतेंतल्या कोठल्याहि विशिष्ट वर्गाशी, पंथाशीं अथवा मताशी एकरूप होणे नव्हे. जनतेचीं सुखदुःखें जाणतां यावीत आणि तिच्या आकांक्षांशींहि पत्रकारांनी आत्मीयतेने एकरूप व्हावें, ( दि. ३० मे १९४२)