पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अक्षय्य टिकणाऱ्या कलाकुसरीचे कारागीर बना २८३ पाहिजे, वर्षभर तें पुरलें पाहिजे, त्याचप्रमाणे वृत्तपत्रकारांचे कांहीं लिखाण तरी वाचकांच्या मनांत खोल मुरले पाहिजे आणि ती शिदोरी त्या वाचकांस पुढे जेव्हां केव्हां प्रसंग येईल त्या वेळी उपयोगी पडली पाहिजे. अशी शिदोरी पुरविण्यासाठी आपल्याला एकेक विषयाचा सखोल व मूलग्राही अभ्यास केला पाहिजे. शोभेच्या दारूचे दुकानदार हल्लींच्या अभ्यासांत व लिखाणांत उथळपणा फार दिसतो. सध्याची वेळ भागली, चालू फड येन केन प्रकारेण जिंकला, वाचकाला आतांपुरतें रिझविलें व त्याच्या मनावरचें चिंतेचें पटल क्षणमात्र दूर केले की आपले काम भागले, असे आपण मानता कामा नये. वीस-पंचवीस वर्षानंतर आपल्या वृत्तपत्रांच्या नियतकालिकांच्या जुन्या फायली चाळल्या तर त्या वेळी पुनःश्च वाचण्यासारखें व संग्रही ठेवण्यासारखे जे लिखाण असेल तीच आपली वाचकांना व समाजाला खरी देणगी होईल. बाकीचे लिखाण ही शोभेची दारू. ती पेटत असेल तोपर्यंत पाहण्यांत मांज, पण एकदां ती विझून गेली की मागें काय कोळसे व खापया ! समारंभाच्या शोभेकरितां अशा दारूचीहि गरज असतेच, व त्यांत ती तयार करणान्याच्या कौशल्याची तारीफाह होत नाहीं असें नाहीं, पण वृत्तपत्रकारांनी आपण केवळ शोभेची दारू तयार करणाच्या कारखानदारासारखे घटकाभर शोभेचें लिखाण लिहिणारे न बनतां पिढ्यानुपिढ्या अक्षय्य टिकणारे कलाकु- सरीचें काम करणारे कारागीर व्हावें अशी ईषा बाळगून चालावें. निदान आपल्या लिखाणाला जास्तीत जास्त दिवस आयुष्य लाभेल असें ज्ञान त्यांत ओतण्याची महत्त्वाकांक्षा धरून ती सफल होण्यासाठी जरूर ते कष्ट सोसण्याची सिद्धता आपण दर्शविली पाहिजे. परिषदेच्या कार्यासंबंधी अपेक्ष। आपल्या रोजच्या व्यवसायासंबंधाची जी ही दृष्टि तीच आपण या परिषदेच्या कार्याांसंबंधांतहि ठेवावी; आणि वरकरणी तात्पुरतें भपकेबाज असे दिसणारे ठराव करण्यांत समाधान न मानतां आपल्या परिषदेचे ठराव निदान दहा वर्षांनंतर कोणी वाचून पाहील तर त्यास त्या वेळींहि ते विचार करावयास लावतील इतके भारदस्त व मूलग्राही असावेत अशी माझी अपेक्षा आहे.