पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८२ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध कायदेशीर हक्क, त्या हक्कांचे उल्लंघन झाल्यास दाद लावून देणारी संस्था, स्त्री, बाल, रुग्ण, वृद्ध इत्यादिकांना ईप्सित स्थळी पोंचविण्याचें काम करणारी एजन्सी इत्यादि गोष्टींचा ऊहापोह करणारे एखादें वृत्तपत्र सुरू केले व त्याबरोबरच वर दिग्दर्शित केलेल्या कामांपैकी एकेक काम क्रमाक्रमानें अंगीकृत करणारी एजन्सी निघाली, तर त्या दोहोंच्या सहकार्याने समाजाची एक मोठी गैरसोय दूर होईल. मासल्या- दाखल एकदोन उदाहरणे सांगतों. सोलापुरास नुकत्याच झालेल्या चित्पावन परि- षदेला पुण्याहून अनेक गृहस्थ गेले. पण त्यांतल्या कित्येकांना पुण्याहून सोलापूरचें बारा दिवसांच्या मुदतीनें रिटर्न तिकीट सवलतीने मिळतें हें माहीत नसल्यानें जातां येतांचें वेगवेगळे तिकीट घेतले जाऊन नुकसान झाले. प्रवासी वृत्तपत्र असले व त्याच्या कचेरींत कोठल्याहि प्रवासाची माहिती मिळते असे कळलें तर उभय- तांनाहि त्यांत फायदा होईल. दर महिन्याला रेल्वेची वेळापत्रके खरेदी करण्यांत अनेकांचे पैसे खर्च होतात. 'प्रवासी' वृत्तपत्राने सगळी वेळापत्रके मिळण्याची किंवा माहिती देण्याची सोय केली तर प्रवासी लोक त्याचा फायदा घेतील. मात्र दुस- ज्याला त्रास देऊन त्याच्याकडून फुकट माहिती मिळविण्याची आपल्या लोकांतली संवय नाहींशी झाली पाहिजे. पत्रकारांचे द्विविध कार्य पत्रकारांनी आपले सर्व लक्ष केवळ चालू घालमेली आणि त्यासंबंधाचें अल्प- काळ टिकणारें विधिनिषेधात्मक लिखाण याच्याकडेच गुंतवूं न देतां अधिक टिकाऊ व विद्वत्तापूर्ण अशा लिखाणाकडे आपली नजर सतत ठेवावी. हे सांगतांना मला आतां लवकरच सुरू होणाऱ्या पावसाळ्याची आठवण झाली आणि त्यावरून अशी कल्पना सुचली की, वृत्तपत्रकारांस जर कोणत्या सृष्टिचमत्काराची उपमा शोभत असेल तर ती पावसाळ्याची होय. पावसाचें कार्य जसें दुहेरी असतें तसेंच आपणां वृत्तपत्रकारांचें कार्यहि दुहेरी आहे. पावसाचें सद्यःकल उन्हामुळे होणारा ताप शांत करणे, रस्त्यावरील, घरावरील, झाडांझुडपांवरून धुरोळा पार घालवून टाकून त्यांना स्वच्छ व टवटवीत करणे आणि आरोग्याला बाधक अशी सगळी घाण वाहून नेऊन पार नाहींशी करणे, हें कार्य तर पावसानें केले पाहिजेच; परंतु एवढेच कार्य करून तो राहील तर ती वरकरणी तकलुपी साफसफाई होईल. पाव- साचें खरें चिरफलदायी कार्य म्हणजे भूमीच्या पोटांत पाणी मुरवून त्याचा वर्षभर सर्व जनतेला उपयोग होईल असें करणें हें होय. वृत्तपत्रकारांनाहि अशी कामगिरी करावयाची असते. जेथें कोठें तत्कालीन जुलुम, दडपशाही, अन्याय यांचा धुरोळा किंवा चिखल सांचला असेल तो आपल्या टीकाप्रवाहाने साफ धुवून नामशेष करावयाचा आणि दुःखितांची अंतःकरणें पुनःश्च टवटवीत करावयाची, हें नित्याचें कार्य चुकतां कामा नये. पण त्यांबरोबरच पावसाचे पाणी जसे जमिनीत मुरले