पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अक्षय्य टिकणाऱ्या कलाकुसरीचे कारागीर बना २७९ संघाच्या स्थापनेला त्याचा मोठा उपयोग होईल. आधी सुटे मणी आणि नंतर त्याचा एकत्रित हार हा क्रम अधिक स्वाभाविक व व्यावहारिक आहे. त्या दृष्टीने पुण्यास पत्रकारांचा संघ स्थापन होऊन गेले कित्येक महिने त्याचें काम सुरळीतपणे चालू आहे. आणि असा संघ स्थापन झाल्यामुळेच आजच्या या संमेलनाचें कार्य शिरावर घेणें आम्हांस सुकर झाले. या अनुभवाचा फायदा घेऊन, ज्या ज्या ठिकाणी पत्रकारांची संख्या हाताच्या बोटांहून अधिक असेल तेथें तेथें प्रथम असे स्थानिक संघ निर्माण व्हावेत आणि नंतर अशा संघांच्या विचाराने मध्यवर्ति संघाची स्थापना व्हावी, हे युक्त होय. म्हणूनच जेथें जेथें असे संघ स्थापन झाले असतील त्यांचें मी हार्दिक अभिनंदन करतो. असा संघ स्थापन झाल्याचें अगदी ताजें उदाहरण अकोल्याचे आहे. वन्हाडांत आणखीहि इतरत्र असे संघ स्थापन होत आहेत हे सुचिन्ह होय. 'पत्रकार' शब्दाची व्यापक व्याख्या पत्रकार संघाच्या संबंधानें अद्यापि एकच एक कल्पना निश्चित झाली नसून या संबंधांत पूर्वीपासूनच थोडासा मतभेद असलेला दिसतो. पुण्याच्या संमेलनांत जेव्हां हा प्रश्न चर्चेला निघाला त्या वेळी 'पत्रकार' या शब्दाची व्याख्या संकुचित करण्यांत आली; त्यामुळे त्या व्याख्येंत बसूं न शकणाऱ्या वार्ताहरांनी व इतर लेखकांनी आपापले वेगळे संघ स्थापण्याचा विचार योजिला. पण त्यामुळे कोणताहि एक संघ सुसंघटित व कार्यक्षम होऊं शकत नाहीं असा अनुभव आलेला पाहून पुण्यांत पत्रकारांचा हा संघ स्थापन करतांना पत्रकार शब्दाची व्याख्या विस्तृत करण्यांत आली. या व्याख्येमुळे ज्याचा ज्याचा कोणत्याहि नियतकालिकाशीं लेखक या नात्यानें संबंध येतो त्याला त्याला या संघाचे सभासद होतां येतें. मागील संमेलनाचे अध्यक्ष श्रीयुत काकासाहेब लिमये यांनी आपल्या भाषणांत अशीच व्यापक संघटना करण्याचा सल्ला दिला होता हैं आपणांस विदित असेलच. पुण्यांतील संघाची स्थापना अशा विस्तृत पायावर झाली असून हे धोरण श्रेयस्कर आहे असे या संघास वाटतें व इतरांनाहि तसाच अनुभव येईल अशी अपेक्षा आहे. मराठी भाषेतल्या लेखकांची संख्या आधीच मर्यादित. त्यांत स्वतंत्र ग्रंथकारांची आणि नियतकालिकां- तील लेखकांची संख्या अधिकच मर्यादित असणार. तेव्हां एवढ्या अल्पसंख्य वर्गानें तरी आपल्यांत पोटभेद निर्माण न करतां सर्वांनी एका समान भूमिकेवर राहून साहित्यसेवा करावी, व अशा अल्पसंख्य वर्गाच्या हिताची काळजी एकाच मध्य- वर्ति संघाकडून घेतली जावी म्हणजे पोटसंघाच्या परस्पर विरुद्ध धोरणामुळे कार्य- हानि होणार नाहीं व संघटना अधिक दृढ व प्रबळ होईल अशी अपेक्षा आहे.