पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७८ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध अखंड भारतीय मराठी पत्रकार परिषद, पुणे अक्षय्य टिकणाऱ्या कलाकुसरीचे कारागीर बना (स्वगाताध्यक्ष केसरीकार श्री. ज. स. करंदीकर यांचा पत्रकारांना सल्ला ) वीस-पंचवीस वर्षांनंतर आपल्या वृत्तपत्रांच्या व नियतकालिकांच्या जुन्या फायली चाळल्यावर त्या वेळी पुनःश्च वाचण्यासारखें व संग्रहीं ठेवण्या- सारखें जें लिखाण असेल तीच आपली वाचकांना व समाजाला खरी देणगी होईल. बाकीचें लिखाण ही शोभेची दारू. ती पेटत असेल तोपर्यंत पाहण्यांत मौज, पण एकदां ती विझून गेली कीं, मार्गे काय कोळसें व खापया ! समा- रंभाच्या शोभेकरितां अशा दारुचीहि गरज असतेच व त्यांत ती तयार करणान्याच्या कौशल्याची तारीफ होत नाहीं असें नाहीं. पण वृत्तपत्रकारांनीं आपण केवळ शोभेची दारू तयार करणाऱ्या कारखानदारासारखे घटकाभर शोभेचें लिखाण लिहिणारे न बनतां पिठ्यानुपिढ्या अक्षय्य टिकणाऱ्या कला- कुसरीचें काम करणारे कारागीर व्हावें अशी ईर्षा बाळगून चालावें. निदान आपल्या लिखाणाला जास्तीत जास्त दिवस आयुष्य लाभेल असें ज्ञान त्यांत ओत- ण्याची महत्त्वाकांक्षा धरून ती सफल होण्यासाठीं जरूर कष्ट सोसण्याची तयारी दर्शविली पाहिजे,” असा स्फूर्तिप्रद संदेश स्वागताध्यक्ष श्री. ज. स. करंदीकर यांनी आपल्या भाषणांत मराठी पत्रकारांना दिला. पत्रकार प्रतिनिधि बंधूंनो, 66 पत्रकारांच्या स्थानिक संघटना यंदाचें हें संमेलन भरविण्याचें कार्य येथील पत्रकार संघाच्या विद्यमानें होत आहे, हे आवर्जून सांगण्यांतला हेतु असा की, पत्रकारांचा संघ निर्माण व्हावा, असा जो ठराव पूर्वीच्या संमेलनांत झालेला होता त्याची पुणे शहरांत बजावणी होऊन राहिली आहे, हे आपल्या निदर्शनास यावें. अखिल महाराष्ट्रांतील पत्रकारांचा एक मध्यवर्ति संघ असावा, ही गोष्ट इष्ट आहे व ती आम्हांसहि मान्य आहे. पण असा मध्यवर्ति संघ निर्माण करण्यापूर्वी ठिकठिकाणी असेच स्थानिक संघ निघून त्यांचें कार्य जोमाने व निर्वेधपणे चालू लागल्यास मध्यवर्ति ( केसरी, दि. २० मे १९४१ ) A