पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८० श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध वृत्तसल्लागार समित्यांचा उपक्रम मुंबईचें संमेलन होऊन दीड वर्ष होत आहे. मध्यंतरींच्या काळांत वृत्तपत्र- कारांवरील सरकारी नियंत्रण सैलावत न जातां अधिक आंवळत चाललें. तथापि एक गोष्ट मात्र सरकारने सकृदर्शनी बरी दिसण्यासारखी केली. मध्यवर्ति 'प्रेस अॅडव्हायसरी' कमिटी नेमण्यांत आली असून तिच्या प्रांतवार शाखा स्थापण्यांत आल्या आहेत. या योगानें पत्रकारांना आपली गान्हाणीं सरकारी अधिकाऱ्यांच्या कानावर घालण्याला एक प्रतिनिधिभूत संस्था मिळाली व अधिका-यांशी प्रत्यक्ष संबंध आला. या प्रेस ॲडव्हायसरी कमिटीचा सल्ला कितपत विचारला जातो, आणि दिलेला सल्ला कितपत मानला जातो हा एक प्रश्नच आहे. त्याचा ऊहापोह परिषदेंत होईलच. येथे त्याचा उल्लेख करण्यांतला हेतु एवढाच की, मागील संमेलनानंतर पत्रकारांना सरकारदरबारांत पर्यायानें तरी प्रवेश मिळाला. त्याचा अधिकांत अधिक उपयोग करून घेणें व तेथें छाप पाडणें हें प्रेस अॅड- व्हायसरी कमिटीच्या कार्यकौशल्यावर अवलंबून राहील. नवीन विधायक कार्याचा विचार आपल्या मार्गातील अडचणी, आपणांवर ओढवणारी संकटें आणि सोसावी लागणारी दडपशाही यांचाच आपण नेहमी अधिक विचार करतो आणि आपल्या ठरावांचाहि सुख्य भर निषेधावरच असतो. मला असे वाटतें कीं, 'न जानपदिकं दुःखं एकः शोचितुमर्हति । ' या भारतकारांच्या वचनानुरोधानें सार्वजनिक संकटाचा सार्वजनिक रीतीने ऊपापोह करण्याकरितां आपण जमत असल्यानें आपल्या गाहाण्यास येथें वाचा फुटांवी व तद्दर्शक अनेक ठराव व्हावेत हें स्वाभा- विक आहे. तथापि ही दुःखनिवारक विचारसरणीची बाजू बाजूस सारून आपण कांहीं थोडा वेळ तरी नवीन प्रवृत्तिपर विचारांना वेळ द्यावा. त्यात कोणाचा निषेध करावयाचा नसल्याने आणि परभारें परोपदेश न करतां 'सांगावें तें आपणाला आपणू करितां बरें ' असे त्याचे स्वरूप असल्यामुळे ठरावांच्या भाषेत ते विचार न बसवितां त्यांस केवळ विचारविनिमयाचें स्वरूप यावें. आपल्या व्यवसायाची वाढ कशी होईल, त्याला सुस्थिति कशी प्राप्त होइल, अनेकांगांनी या व्यवसायांत भर कशी पडेल, आपले लिखाण अधिकाधिक विचारप्रवर्तक कसे होईल, नवीन मार्ग दर्श- विण्याला त्याचा अधिकाधिक उपयोग कसा होईल, या व्यवसायांत एकांगीपणा न येतां अव्यभिचारिणी भक्तीनें एकेका अंगाची जोपासना कशी होईल, आपली नियत- कालिके समाजांतील ज्या कानाकोपच्यांत आज प्रवेश करीत नसतील त्या काना- कोपन्यांतहि त्यांची गरज कशी उत्पन्न करता येईल ? आधीच पोटभर जेवणारांना अधिकाधिक आग्रह करून त्यांना अजीर्णमूलक व्याधि जडविण्याचें पातक करण्या- पेक्षां ज्या क्षुधातुरांना कोणतेच वाङ्मयभोजन मिळत नाही त्यांना पथ्यकर, 2