पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

केसरी पत्राचं ध्येय, धोरण व ब्रीड़ २७७ कांची उघड कृति तेवढी दिसे; पण तिच्या पाठीमागील कारणे व डावपेंच त्यांना • माहीत असणे शक्य नव्हते. त्यामुळे जेव्हा जेव्हां टिळक आज असते तर त्यांनीं काय केलें असतें असा प्रश्न निघतो, त्या वेळी त्यांच्या पूर्वीच्या एखाद्या कृतीवरून तिहाइताने काढलेले अनुमान खरे असण्यापेक्षां टिळकांच्या धोरणाशी समरसता 'पावलेल्या अनुयायांनाच टिळकांनी काय केलें असतें हें नक्की सांगतां येतें. टिळकांचीं सर्व बाबींमतें सर्वतोपरी मान्य टिळकांच्या मतांशी समरस होण्याचा प्रश्न निघाला म्हणून ओघानेंच व थोडासा आत्मश्लाघेचा दोष पत्करून प्रस्तुतच्या संपादकाला एवढे नमूद करून ठेवावेसे वाटते की, प्रस्तुतच्या लेखकाचें टिळकांच्या मताशीं अधिकांत अधिक तादात्म्य प्रतीतीस येईल. १८९२ सालचा टिळकांचा 'ओरायन' हा पहिला ग्रंथ आणि १९२० एप्रिल महिन्यांतील सांगलीची पंचांग-परिषद येथपर्यंतच्या २८ 'वर्षांच्या कारकीर्दीत टिळकांनी जे जे ग्रंथ लिहिले, जी जी भाषणे केलीं, जें जें • इतर लिखाण लिहिलें त्यांतले मर्म प्रस्तुत संपादकाला सर्वतोपरी पटले आहे. महा- भारत ग्रंथाविषयींची आवड असो, गीतारहस्यांतले कर्मयोगाचें प्रतिपादन असो, शिवाजी, रामदास प्रभृति ऐतिहासिक विभूतींच्या कामगिरीचा प्रश्न असो, ईश्वराचें अस्तित्व, आत्म्याचें अविनाशित्व, पुनर्जन्म इत्यादि वेदान्तविषय असोत, अथवा · स्त्रीशिक्षण, स्त्रियांचे हक, अस्पृश्यतानिवारण, मद्यपानबंदी इत्यादि सामाजिक चळवळी असोत, कीर्तनसंमेलन असो अथवा ऐतिहासिक संशोधन असो, प्रत्येक ‘बाबतींत प्रस्तुत संपादकाला टिळकांची मतें अवगत झाली असून ती पूर्णतः पटलीं आहेत. इतर अनेक अनुयायांचा कोठल्या ना कोठल्या तरी मुद्द्यांवर टिळकांशी थोडा तरी मतभेद असेल, पण प्रस्तुत लेखकाला टिळकांची राजकीय, धार्मिक, •सामाजिक, आर्थिक, शिक्षणविषयक सर्वच्या सर्व मतें संपूर्णपणें निरपवाद मान्य आहेत. असे असतां टिळकांची कोठली तरी दोनचार व्याख्याने ऐकलेले व •त्यांच्या लेखांतील कांहीं थोडा भाग केव्हा तरी वाचलेले असे आक्षेपक ज्या वेळी टिळकांचें अमक्या विषयावर मत असेच होते आणि त्यांनी असेच केलें असतें आणि टिळकांच्या अनुयायांपैकी कोणालाहि टिळकांचें खरें मत कळलेलेच नाहीं असे म्हणू लागतात तेव्हां त्यांचें धाडस पाहून हंसूं येतें. सांगण्याचा मतलब येवढाच की, जुन्या तशाच नव्या केसरीकारांना टिळ- कांचें समग्र चरित्र आणि त्यांची जाहीर व खासगी सर्व मतें अवगत असल्यानें टिळकांनी केव्हां काय केले आणि केव्हां कोणती गोष्ट टाळली हे ध्यानांत आणून, त्या धोरणानें प्रस्तुतच्या परिस्थितीत टिळकांनी काय केलें असतें तें तर्कानें जाणून त्यांच्याशी सुसंगत असेच धोरण राखतां येतें; आणि म्हणूनच केसरीच्या धोरणांत अखंड एकसूत्रता टिकलेली आहे.