पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध यांनीच केसरीचे संपादक आणि संस्थेचे ट्रस्टी म्हणून राहावें अशी इच्छाहि व्यक्त केली. टिळकांचेंच धोरण तात्यासाहेब केळकर हे चालवतील अशी तत्पूर्वीच्या २४ वर्षाच्या अनुभवावरून व त्यांतल्या त्यांत १९१४ पासून १९२० पर्यंत म्हणजे टिळकांच्या गैरहजेरीत नव्हे तर सान्निध्यांत व त्यांच्या डोळ्यासमोर, टिळकांची खात्री पटली नसती, तर टिळकांनींच एक तर हल्लीचेंच संपादकीय धोरण चालं. ठेवा असें मृत्युपत्रांत लिहिले नसते, किंवा तात्यासाहेब केळकरांना संपादक व ट्रस्टी न नेमतां दुसरीच कांही व्यवस्था केली असती. ती तशी केली नाही यावरून तात्यासाहेब केळकरांनी टिळकांचेच धोरण चालविले होतें हैं सिद्ध आहे. २७६


टिळक हयात होते तोपर्यंत केळकरांनी टिळकांच्या मताप्रमाणे लिहिले. असेल, पण मागाहून त्यांनी पगडी फिरविली असेल असें म्हणावें तर तसा प्रकार कोठेंहि दिसून येत नाहीं. एकदां रुळाला लागलेली आगगाडी जशी ठरलेल्या मार्गानेंच पुढे जाते त्याप्रमाणेच टिळकांच्या मृत्यूनंतरह पूर्वीच्याच रुळावरून केसरीची गाडी चालत राहिली. याचा प्रत्यंतर पुरावा हाच की, केसरींतल्या १९२० च्या ऑगस्टपासून कोणताहि अग्रलेख घ्यावा आणि त्याला टिळक-सूक्ति- संग्रहांतून एखादा योग्य मथळा देतां येतो काय हे पाहावें, म्हणजे सूक्तिसंग्रहांतील टिळकांच्या तोंडचें किंवा हातचें वचन अलीकडील लेखांच्या शिरोभागी समुचितच दिसेल व त्यावरून एकसूत्रीपणाची खात्री पटेल. वस्तुस्थिति अशी आहे की, केसरीवर आक्षेप घेणारांनाच टिळकांचें खरें धोरण काय होतें, याची यथार्थ कल्पना आलेली नसते. मनुष्याच्या तोंडचें कुठल्या तरी वेळचें एखादें वाक्य घेऊन त्यावरून जन्माचें शील ठरविण हें जसे चुकीचे होईल, तसेंच एखाद्या राजकारणी पुरुषाच्या कुठल्या तरी भाषणांतलें अथवा लेखांतले एखादें वचन ऐकून किंवा वाचून त्या राजकारणी पुरुषाचें धोरण ठरविणें हें हास्यास्पद होय. वक्ता वेळप्रसंग बघून बोलत असतो व लेखकहि देशकालमर्यादा जाणून लिहीत असतो. अशा स्थितीत त्याचें कोठले तरी संदर्भरहित एखादें वचन त्याच्या सगळ्या धोरणावर प्रकाश कसा पाडणार ! मनु- प्याचें शील ठरविण्याला त्याचें समग्र चरित्र पाहिलेले असले पाहिजे, त्याप्रमाणेंच राजकारणी पुरुषाच्या अनेक हालचाली सूक्ष्मतेनें निरीक्षिल्या तरच त्याच्या धोरणाविषयों बरोबर कल्पना येईल. टिळकांचें समग्र चरित्र इतक्या सूक्ष्मपणे पाहणें हे आक्षेपकांना शक्य होतें, का केळकर प्रभृति केसरीच्या संपादकवर्गास तें अधिक शक्य होतें, याचा विचार वाचक सहज करूं शकतील. कोणतेंहि धोरण ठरविण्या- पूर्वी टिळक स्वपक्षांतील पुढान्यांशी साधकबाधक सर्व प्रकारची चर्चा करीत आणि आपले मत ठरवीत; यामुळे केळकर प्रभृति जवळच्या मंडळींना टिळकांनी काय केलें एवढेच माहीत नसून तें कां केलें, कसें केलें, हेंहि माहीत असे. आक्षेपकांना टिळ-