पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

केसरी पत्राचें ध्येय, धोरण व ब्रीद २७५ लाभावँयाचें असल्यास त्या सरकारला जेरीस आणावयाचे सर्व उपाय जारीनें अमलांत आणले पाहिजेत हंहि शतशः खरे आहे, पण तूर्त तरी परकी सरकारला मुसलमानांची मोठी ढाल हाती सांपडली असून काँग्रेसवाले त्या मुसलमानांना डोक्यावर बसवून घेऊन प्रोत्साहनच देत आहेत. याकरितां केसरीकारांना सरकारच्या हातची ही ढाल हिराऊन घेण्यासाठी हिंदुसमाजांत जागृति उत्पन्न करून ती समाज बलसंपन्न करण्याचे कार्य हाती घ्यावे लागले आहे. बलसंपन्न अशा हिंदु- समाजाच्या तीक्ष्ण धारेपुढे आपल्या हातची मुसलमानांची ढाल निरुपयोगी ठरते असे सरकारला कळून आले म्हणजे सरकार वठणीवर येईल आणि मग अखंड भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा मार्ग खुला होईल. तसा तो मार्ग खुला व्हावा यासाठींच केसरीचा अखंड प्रयत्न चालू आहे. टिळकांच्या धोरणाची यथार्थ कल्पना परिस्थिति बदलली तर धोरणहि बदलावें लागतं याची ज्यांना कल्पना नाहीं त्यांना टिळकांच्या राजकारणाची यथार्थ कल्पना येणार नाही आणि मग अर्थातच टिळकांच्या पश्चात गेल्या २० वर्षांत टिळकांचेंच धोरण केसरीने पुढे चालविलें आहे ही कल्पनाहि त्यास पटणार नाहीं. पण अशा दुरा- राध्यांच्या नादी लागण्यांत कांहीं हंशील नाहीं. कित्येकांची चळवळीविषयींची कल्पना इतकी विपरीत असते की, त्यांना टिळकांचें सुद्धां धोरण पटत नाही. १९०८ सालचे टिळक तेवढे आम्हांला मान्य, पण १९१४ सालानंतरचे टिळक अमान्य असेहि म्हणणारे कांहीं हरीचे लाल आढळतात ! ज्यांना टिळकांच्याच जुन्या व नव्या धोरणांतली सुसंगता कळत नाही, त्यांना १९२० नंतर केसरी- कारांनी टिळकांचेंच धोरण पुढे चालविलें ही गोष्ट कशी पटणार ? अशा सारा- सार विचारहीन लोकांची राजकारणाची कल्पना किती अव्यवहार्य व अदूरदर्शी असते तें सिद्ध करणें हा प्रस्तुतचा विषय नसल्याने तो सोडून देऊं. त्यांना एवढेच मोघम उत्तर देऊन ठेवूं कीं, शिकारीवर झडप घालणारा सिंह देखील आपले डाव- पेंच प्रसंगानुरूप बदलतो मग सनदशीर झगडा करणाऱ्याची तर काय कथा ? असो. एकसूत्रीपणाची कोणतीहि कसोटी लावा पण ज्यांना टिळकांचें धोरण अखेरपर्यंत मान्य होते आणि ज्यांना टिळकांचें मृत्युपत्र असे मानलेला डेमॉक्रॅटिक स्वराज्य पार्टीच्या निवडणुकीचा जाहीर- नामाहि मान्य आहे, अशांनी टिळकांच्या मृत्यूनंतर केसरीचें धोरण पूर्वीचें राहिले नाही, असे म्हणावें याचें आश्चर्य वाटतें. टिळकांनी आपलें धोरण डेमॉक्रॅटिक पार्टीच्या जाहीरनाम्यांत लिहून ठेवले आणि आपल्या अखेरच्या मृत्युपत्रांतहि “ केसरीची एडिटोरियल पॉलिसी हल्ली आहे ती बदलू नये हल्ली आहे तशीच चालवावी, असें मुद्दाम नमूद केले आणि टिळकांनींच श्री. तात्यासाहेब केळकर "