पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७४ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध शरीरावर वार करण्यापूर्वी ढालीवर वार या सर्व अंतःस्थ कलहापेक्षां हिंदु-मुसलमानांतला झगडा गेल्या दहा वर्षांत अत्यंत विकोपाला गेला. स्वातंत्र्योत्सुक वीरांचे वार चुकविण्याला मुसलमानांची ढाल अधिक उपयोगी पडणारी आहे, असे वाटल्यावरून सरकारने ती ढाल पुढे करून स्वराज्य देण्याची टाळाटाळी चालविली आहे. आणि या झगड्यांत सर- कारला चीत करावयाचें झाल्यास आधी त्यांच्या हातची ढाल दूर केली पाहिजे. हें क्रमप्राप्तच असल्याने केसरीला हिंदुसभेचा पुरस्कार करून मुसलमानांचीं राष्ट्र- विघातक कारस्थाने चव्हाट्यावर मांडावी लागली आणि अत्यंत खेदाची गोष्ट अशी कीं, काँग्रेसपक्षच अदूरदर्शीपणानें मुसलमानांचा कैवारी बनल्याने काँग्रेस- वरहि या बाबतीत तेवढ्यापुरता हल्ला चढवावा लागला. यामुळे इतका खोल विचार न करणाऱ्या माणसास कित्येक प्रसंगी असा देखावा बाह्यतः दिसूं लागला की, केसरीकार स्वातंत्र्यसंपादनासाठी सरकारशी झगडावयाचें सोडून आपली शक्ति काँग्रेसशी, मुसलमानांशी, सुधारकांशी, अस्पृश्यांशी, मजूरवर्गाशी, शेतक-यांशी लढण्यांत व्यर्थ व्यतीत करीत आहेत. पण वास्तविक प्रकार असा आहे की, सर- कारशी चाललेल्या अखंड झगड्यांतलेच हें एक विशिष्ट व प्रसंगप्राप्त अंगच आहे. प्रतिपक्षांशी द्वंदयुद्ध खेळत असतांना तो प्रतिपक्षी आपल्याच आप्तांपैकी कोणाला तरी वश करून घेऊन त्याला पुढे करून त्याच्या आड लपूं लागला, तर प्रतिपक्षाचा समाचार घेण्यासाठींच त्या आप्ताचा समाचार घ्यावा लागतो किंवा अनेक शस्त्रास्त्रांनी सजलेल्या योद्धयाशी लढावयाचें झाल्यास तो जें जें शस्त्र पुढें करील त्याचा प्रतिकार करण्याला उपयोगी पडेल असेंच शस्त्र आपणांस हाती घ्यावे लागते आणि प्रतिपक्षी आपल्या बचावाची जी ढाल पुढे करील अथवा जें कवच व शिरस्त्राण अंगावर घालील त्याच्यावरच आधी मारा करावा लागतो. अशा वेळी युद्धकलेचा अनभिज्ञ टीकाकार जर असे म्हणूं लागला कीं, तुम्ही शत्रूच्या छातीवर वार करण्याऐवजी त्यांच्या ढालीवर कसले वार करीत बसला आहां, तर असल्या बाष्कळ टीकेनें वीराला आपले योग्य धोरण बदलण्याचें कारण नाहीं. शरीरावर वार करण्यापूर्वी ढालीवर वार करावा लागतो, एवढेच नव्हे तर एक ढाल तुटली असतां दुसरा मनुष्य जर दुसरी ढाल त्याच्या हाती देण्यासाठी येत असेल तर त्या दुसऱ्या मनुष्यासहि अडविणें हें डावपेंचाच्या दृष्टीनें अगदी आवश्यकच आणि परिणामकारकहि असते. सरकारविरुद्ध चालविलेल्या झगड्यांत मुसलमानांच्यावर आणि त्या मुसलमानांना डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या काँग्रेसवाल्यांवर केसरीकारांचा इतका निकराचा हल्ला कां, याचा उलगडा वरील दाखल्यावरून सुज्ञ वाचकांस होईल. परकी सरकार हा आमचा मुख्य प्रतिस्पर्धी हें निःसंशय खरें आहे; आणि भरतखंडाला स्वातंत्र्य