पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कसरी पत्राचे ध्येय धोरण व ब्रीद २७३ आणि त्यांनी १९२० साली आपल्या मृत्यूपूर्वी डेमॉक्रॅटिक स्वराज्यपाटींचा जो जाहिरनामा तयार केला, तो याच धोरणाने लिहिला होता. नवे अंतःस्थ कलह व ते मिटविण्याचे मार्ग वरील विवेचनावरून वाचकांच्या लक्षांत येईल की, स्वराज्यसंपादनासाठीं ब्रिटिश सरकारशी टिळकांची झुंज सतत चालू होती. तरी पण ब्रिटिश सरकार आपल्या वतीने लढण्याकरितां जेव्हां सुधारक, मुसलमान, ब्राह्मणेतर अशा वर्गाला पुढे करीत असे त्या त्या वेळी टिळकांना त्या वर्गाशी झगडावे लागले. पण त्यांत स्वातंत्र्यप्राप्तीचा मूळ उद्देश सुटला असे मुळींच नाहीं. १९२० नंतर सरकारने आणखी इतर अंतःस्थ कलह पेटवून दिले. भांडवलवाले व मजूर, जमीनदार व शेतकरी, धनको व ऋणको, नागरिक व खेड़त, स्पृश्य व अस्पृश्य असे अनेक पोटभेद मानून कधी एका वर्गाला तर कधी दुसऱ्या वर्गाला चिथावणी देऊन राष्ट्राची शक्ति आपआपसांतील यादवीतच क्षीण व्हावी आणि आपल्यावरील हळ्याचा जोर कमी व्हावा अशी कुटिल नीति सरकारने अवलंबिली. त्यामुळे केसरीलाहि त्या त्या वर्गाचे योग्य समाधान करण्यासाठी त्या त्या प्रतिपक्षाशी वाद करावा लागला. आणि या वादांत केवळ एकाचीच बाज़ सर्वथैव न्यायाची आणि दुसऱ्याची बाजू निवळ जुलमाची असलें अतिरेकी, व समाजव्यवस्थेला एकंदरीने बाधक, असले मत केसरीचें नसल्याने केसरीला कधी एकाच्या वतीनें तर कधीं त्याच्याच विरुद्ध लिहावे लागले. भांडवलवाले मजुरांना पिळून काढतात असें दिसलें तेथें मजुरांच्या न्याय्य हक्कांसाठी केसरी मजुरांच्या बाजूनें झगडला. अविचारी व अदूरदर्शी पुढान्यांच्या नादी लागून जेव्हां मजूरवर्ग उठल्या- सुटल्या संप करून राष्ट्रांतील उद्योगधंद्यांच्या उत्कर्षाच्या मुळावरच घाव घालतो असे दिसले त्या वेळी केसरीनें मज़रवर्गाची कानउघाडणी केली. शेतकरी वर्ग, कर्जबाजारीपणानें अत्यंत दीन अवस्थेस पोंचला असल्यामुळे त्याच्या सोडवणुकीचे योग्य उपाय केसरीने सुचविले. पण सावकार तेवढा सर्वथैव लबाड, त्याची संपत्ति ही लुटारूपणाची कमाई असल्यामुळे ती त्याच्याकडून बिनमोबदला एकदम जप्त करावी आणि सावकार व जमीनदार वर्ग सर्वथैव बुडवावा असले अतिरेकी व समाजविघातक मत केसरीला मान्य नसल्यामुळे असल्या घातक चळवळीला केसरीनें विरोध केला. अस्पृश्यांची मानीव अस्पृश्यता जाऊन त्यांना मानवी समाजाचे सर्वसामान्य नैसर्गिक हक मिळावे याकरितां केसरी सनातन्यांशीं झग- डला. पण अस्पृश्यांचे कांहीं बेफाम पुढारी हिंदुधर्मच बुडविला पाहिजे, ब्राह्मण- वर्गाला अरबी समुद्रांत बुडवून टाकले पाहिजे, मनुस्मृति जाळली पाहिजे आणि देवालयें जमीनदोस्त करून टाकली पाहिजेत असला आत्मघातक प्रचार करूं लागले, तेव्हां त्यांच्या त्या बेफाम प्रचाराला आळा घालणें केसरीला जरूरीचें वाटलें. 4