पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७२ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध पात्रता अंगी येत नाहीं, ही कल्पनाच आपल्या स्वराज्याच्या चळवळीला बाधक आहे, हे त्यांनी ओळखले आणि सामाजिक सुधारणा झाल्याखेरीज राजकीय चळवळीकडे पाहणे योग्य ठरणार नाही असे म्हणून भांडणाऱ्या भ्रष्ट लोकांशी त्यांना झगडा करावा लागला. हा झगडा न करावा तर स्वराज्याची चळ वळ दुरावते आणि झगडा करावा तर आपल्याविषयीं सुशिक्षितांत गैरसमज पसरतो असा पेंच पडला असतां टिळकांनी स्वतःवर येणाऱ्या आक्षेपांची पर्वा न करतां राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्यांत खंड पडू दिला नाहीं. सरकारच्या शहाला काटशह • अधिकाऱ्यांनी मुसल सामाजिक सुधारणेची मात्रा चालत नाहीं, असें पाहून मानांना हाती धरले आणि त्यांना चिथावून देऊन हिंदु-मुसलमानांचा वाद उत्पन्न केला. याहि वादाला टिळकांनी भीक घातली नाहीं आणि आपली चळवळ भलत्या रुळावरं जाऊं दिली नाही. हे पाहतांच ब्रिटिश पाताळयंत्री अधिकाऱ्यांनी मुसल- मानांना स्वतंत्र मतदारसंघ व जादा जागा मागण्याची चिथावणी दिली. ब्रिटिश अधिकाऱ्यांची ही कारवाई ओळखून टिळकांनीं मुसलमानांशी करार घडवून आणून त्यांच्याशी एकप्रकारची एकी केली आणि सरकारचा सगळा डाव उधळून टाकला. त्यानंतर ब्राह्मण-ब्राह्मणेतरवादाचा प्रचार सुरू झाला. त्या वेळी टिळ- कांना ब्राह्मणेतरांची समजूत काढावी लागली. अशा रीतीनें ब्रिटिश सरकार जो जो शह देईल त्याला काटशह देऊन टिळकांना आपले ध्येय गांठावयाचें होतें. त्यामुळे कधीं ते सुधारकांशी झगडतांना दिसत, तर कधीं मुसलमानांची समजूत काढण्यांत किंवा त्यांची कारवाई हाणून पाडण्यांत गढलेले दिसत. ब्राह्मण-ब्राह्मण- तरवाद विकोपाला जाऊं न देण्यासाठींहि त्यांना झटावें लागले. ही सर्व काम- गिरी करीत असतांना स्वराज्यावरची त्यांची दृष्टि ढळली नव्हती. तथापि वरवर पाहणाऱ्यांना त्यांच्याविषयींहि गैरसमज उत्पन्न होई. पण इतक्याहि प्रतिकूल पारीस्थितीला टक्कर देऊन जेव्हां त्यांनी सरकारला अगदी कोंडीत गांठलें, आणि महायुद्धाच्या अडचणींनीं नाक दाबलें, त्या वेळी कोठें सरकारने तोंड उघडून जबाबदार राज्यपद्धतीचें ध्येय मान्य केलें, आणि सुधारणांचें बाहुलें पुढें केलें. अर्थातच त्यानंतरच्या लढ्याची दिशा थोडीशी बदलली. सुधारणांचा आराखडाच दृष्टीसमोर नव्हता त्या वेळचें लढ्याचें स्वरूप जाऊन सुधारणायुगांत लढ्याला निराळें स्वरूप प्राप्त झालें. इंग्लंडांत १८३२ त रिफॉर्म अॅक्ट पास झाल्यानंतर मतदारांना सुशिक्षित करून, त्यांच्या साहाय्यानें निवडणुकी यशस्वी करून, सर- कारच्या राज्यकारभारांत अडवणूक करून आपले हक्क वाढवून घ्यावयाचे ही जशी प्रथा सुरू झाली, तशी प्रथा हिंदुस्थानांतहि १९२१ सालापासून सुरू होईल व त्या मार्गानेंच यापुढे स्वराज्याचा लढा चालेल अशी टिळकांची अपेक्षा होती.