पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• २७० श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध किंवा इतर कोणत्याहि मोठ्या संस्थेचा किंवा व्यक्तीचा मुलाहिजा केसरीने राखला नाहीं. स्वातंत्र्यप्राप्तीला पोषक व अनुकूल असलेल्या संस्थेचा व व्यक्तीचा पुरस्कार करणे क्रमप्राप्तच कर्तव्य ठरतें. पण तीच संस्था व तीच व्यक्ति स्वतः त्या ध्येया पासून च्युत झाल्यास केसरीलाहि आपले तोंड वळवून जिचे पूर्वी लाड केले तिचेच वाभाडे काढावे लागले. यांत बाह्यतः विसंगति दिसत असली तरी मूळ तत्त्वाच्या व बीदाच्या दृष्टीने पाहिल्यास त्यांत विसंगति मुळींच नसून अढळ अशा ध्येयाशीं तें सुसंगतच आहे. वाघाला घराचे रक्षक मानलें नाहीं स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयाला पहिली आडकाठी परकीय सरकारची; त्यामुळे परकीय सरकारशी झगडणें हें क्रमप्राप्तच कर्तव्य ठरलें व तें कर्तव्य केसरी गेलीं साठ वर्षे अखंड बजावीत आला आहे. त्याच्या या दृष्टिकोनांत कधींहि बदल झाला नाहीं व आपलें ध्येय केसरीनें आपल्या दृष्टीपुढ्न कधींहि ढळूं दिलें माहीं, असें आम्ही आव्हानपूर्वक ठामपणे सांगू शकतों. साठ वर्षांत केसरीचे संपादक अनेक वेळा बदलले. त्यांत एकाची बुद्धिमत्ता व लेखनशैली दुसन्यास जशीच्या तशीच साधत नसल्यामुळे विचारप्रदर्शनाच्या पद्धतींतहि फरक पडला असेल, कोणी वाघाला वाघ म्हटले असेल तर कोणी वाध्या म्हटले असेल, अथवा कदाचित् वाघोबाहि म्हटले असेल. पण वाघाला आपल्या घरचा रक्षक असा इमानी कुत्रा मानण्याची चूक व त्याचे लाड करण्याचें अराष्ट्रीय धोरण कोणींहि कधींच स्वीका- रलें नाहीं. ज्या दिवशी आपल्या राष्ट्राचें स्वातंत्र्य गेल्याची जाणीव जागृत होऊन स्वातंत्र्यप्राप्तीची तळमळ लागून राहिली व त्या स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी जनतेंत जागृति करून जनतेची पात्रता वाढविण्यासाठी केसरीचा अवतार झाला त्या दिवसा- पासून परकी सरकार हाच मुख्य प्रतिपक्षी ठरला व त्याच्याशीं प्रतिपक्षी म्हणूनच आपली वागणूक केसरीनें सतत चालविली आहे, यांत केव्हांहि तिळमात्र खंड पडलेला नाहीं. डावपेंच बदलतात पण कित्येक वेळा असें होतें कीं, प्रतिपक्षी म्हटला तरी त्याच्याशी लढाव- याचे प्रकार व त्याची साधनें नेहमींच सारखी राहत नाहींत. ध्येय तेंच, त्याच्या आड येणारा प्रतिपक्षी तोच असे असूनहि प्रतिपक्षाचे पेंच बदलले की आपलेहि पेंच बदलावे लागतात. त्यावरून कित्येक वेळां अज्ञ जनांची अशी समजूत होते की, यांची कुस्ती थांबली आणि हे शत्रूंत मिसळून दोस्त झाले ! पण वास्तविक प्रकार तसा नसतो. किल्ला सर करावयाचा असतांना प्रथम ३० मैलांवरून मारा करतांना ज्या तोफा व जीं इतर साधनें उपयोगी पडतात, तींच साधनें कांहीं तटाशीं जाऊन भिडल्यावर उपयोगी पडत नाहींत. तेथें तोफांच्यापेक्षां दोरीच्या .