पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

केसरी पत्राचें ध्येय, धोरण व ब्रीद २६९ उठवावयाची आणि जी जी गोष्ट समाजाच्या कल्याणाला उपकारक असेल तिचा पुरस्कार करावयाचा व ती प्रचलित करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावयाचा हेंच केसरीचें ब्रीद आहे. समाजाला अशा प्रकारचें शिक्षण देणे आणि समाजाला तसे वळण लावणे हैं धोरण केसरीनें अखंड चालू ठेवले आहे व त्यापासून तो कधींहि ढळला नाहीं. राष्ट्राच्या हिताला विघातक अशी कृति ज्याच्या ज्याच्या हातून घडेल त्याला त्याला विरोध करून त्याच्या अहितकारक कृतींना प्रतिबंध करावयाचा व अशी कृति करणारे ते आपले प्रतिपक्षी मानून त्यांच्या तसल्या कृतीला आळा घालण्यासाठी चोहोंकडून चळवळीची उठावणी करावयाची, हेंच केसरीचें ब्रीद आहे व त्या ब्रीदापासून तो आजवर कधींहि रेसमात्रहि ढळला नाही. कित्येकांना वरील विधान अतिशयोक्तीचें, आत्मश्लाघेचें आणि धाडसाच वाटेल. या आक्षेपांपैकी आत्मश्लाघेचा आरोप केवळ मानण्यावर व भिन्न दृष्टि- कोनावर अवलंबून असल्यानें त्याच्याविरुद्ध आम्ही फारशी तक्रार करीत नाहीं. इतरांना आत्मश्लाघा वाटली तर वाटो, आम्हांला जें सत्य वाटतें तेंच सांगावयाचें असल्याने आम्ही वस्तुस्थिति म्हणूनच हे विधान केले आहे. मुख्य प्रश्न तपशिलाचा नसून तत्त्वाचा आहे हें सत्य आहे असे म्हटल्यानंतर त्यांत अतिशयोक्तीचा प्रश्नच उद्भवत नाहीं; परंतु धाडसाचा आरोप कांहींसा विचार करण्यासारखा असल्याने त्याचा खुलासा करणे आवश्यक आहे. साठ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत वरील ब्रीदाला बाधक असा लेख चुकूनहि एखाद्या वेळीं आला नसेल अशी हमी देणें घाडसाचेंच आहे, असे वाटण्याचा संभव आहे; आणि मनुष्यप्राणी हा चुकीला पात्र असल्या- मुळे आजवर केसरीच्या चालकांकडून कधीं चूक झालीच नसेल असे आम्हीहि म्हणूं शकत नाहीं. चुका अनेक वेळा झाल्या असतील, पण त्या गैरसमजुतीने किंवा अपुऱ्या माहितीनें झाल्या असतील व त्या तशा झाल्या असल्यास त्यांची दुरुस्तीहि त्या त्या वेळी केली गेली आहे; पण अशा चुका या तपशिलाच्या किरकोळ बाब- तींत संभवतात; पण येथें मुख्य प्रश्न तपशिलाचा नसून तत्त्वाचा आहे आणि तत्त्व हें विचारपूर्वकच ठरविलें जात असल्याने तेथें चुकी संभवत नाहीं. अर्थातच ज्या ज्या गोष्टी राष्ट्रहिताच्या म्हणून केसरीने विचारपूर्वक ठरविल्या त्या तत्त्वाच्या प्रसारार्थ झटण्यांत केसरीनें कधींहि कसूर केली नाहीं आणि त्या तत्त्वाशीं तो कधींद्दि बेइमान झाला नाहीं. उदाहरणार्थ, स्वातंत्र्यप्राप्ति हें एकदां ध्येय ठरविल्यावर जी जी संस्था, जी जी व्यक्ति आणि जी जी कृति स्वातंत्र्याच्या ध्येयाला बाधक असेल तिचा पाडाव करण्याला केसरीनें कधींहि आळस केला नाहीं; आणि त्या बाबतींत खुद्द सरकारचा