पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

200000000000000000000•••0000000 संपादकीय धोरण ....000000000 केसरी पत्राचे ध्येय धोरण व बीद , १ केसरी वर्तमानपत्र प्रसिद्ध करण्याचे ठरले त्या वेळी पहिले प्रसिद्धिपत्रक छापलें गेलें त्यांत पुढील वाक्य आहे, तें असें - "वरील वर्तमानपत्रांत विवेचन जें करावयाचें तें निःपक्षपातबुद्धीनें व आम्हांस जें खरे वाटेल त्यास अनुसरून करावयाचे असा आमचा कृतसंकल्प आहे; सदर पत्रांतील लेख त्यास ठेवलेल्या नावाप्रमाणेच येतील असे समजावें. " या वाक्यावरून केसरीचें धोरण सामान्यतः कोणतें राहणार त्याची दिशा ठरली. “जें सत्य असेल तेंच सांगावयाचें, त्यांत पक्षपातबुद्धि धरावयाची नाही आणि सांगावयाचें तें निर्भयपणानें व सडेतोडपणानें सांगावयाचें" हे त्याचें ब्रीद यांत जो सत्य शब्द वापरला आहे तो “यलोकहित- मत्यन्तं तत्सत्यमिति धारणा " या वचनांतील व्याख्येला अनुसरूनच वापरलेला आहे. जी जी गोष्ट जनतेच्या कल्याणाची असेल तीच सत्य आणि तिचाच पुरस्कार करावयाचा, लोकहितापुढें व्यक्तीच्या मताचें महत्त्व मानावयाचें नाहीं. कोणाहि व्यक्तीचा अभिमान न धरतां तत्त्वाचा अभिमान धरावयाचा आणि तें तत्त्व ठरवितांना आपल्या देशांतील जनतेच्या कल्याणाची कसोटी त्याला लावावयाची. ज्यापासून लोककल्याण साधेल तेंच सत्य आणि जें जें लोककल्याणाला बाधक असेल तें तें असत्य, अतएव त्याज्य होय. या धोरणानेंच आजपर्यंत केसरींतील लेख प्रसिद्ध केले गेले आहेत; व्यक्ति किंवा संस्था कितीहि मोठी असो, तिचें मत किंवा आचरण समाजाला अकल्याणाच्या मार्गाला नेत असेल तर त्याविरुद्ध झोड ( केसरी, हीरकमहोत्सव अंक, दि. ३ जानेवारी १९४१ )