पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी चलनाचा सोन्याशीं घटस्फोट २६७ पेन्सांला केव्हांहि येऊ शकणार नाहीं. याकरितां रुपयाचा कृत्रिम भाव नैसर्गिक भावाच्या लंबकाच्या हेलकाव्याच्या निदान आटोक्यांत तरी आणावयाचा झाल्यास तो १६ पेन्सांहून अधिक ठेवतां कामा नये. अर्थातच एक रुपया म्हणजे ७.५३ ग्रेन सोनें हा भाव भावी कायद्यानें निश्चित करावा. पण जगांतील सोन्या-चांदीच्या सापेक्ष किंमतींत अनेक कारणांनी फेर- बदल होणें साहजिक असल्यामुळे एकदां ठरविलेला भाव यावच्चंद्रदिवाकरौ कायम राहील अशी कोणीही समजूत करून घेऊं नये. त्याकरितां जरूर तर त्या कायद्यांतच असें कलम घालून ठेवावें कीं, चांदीची किंमत दर औंसास २० ते ३० च्या दरम्यान असेपर्यंत हा भाव कायम राखण्यांत येईल व जर कांहीं आकस्मिक कारणांमुळे तो भाव २० पेन्सांच्या खाली अथवा ३० पेन्सांच्या वर गेला तर या कायद्याचा फेरविचार करण्यांत येईल. सारांश, सध्यां रुपयाचा भाव पौंडाशी जोडून तो राखण्याकरितां हिंदी गंगाजळी रिती करण्याचें आत्मघातकी धोरण बंद करावें; आणि चांदीचा भाव थोडासा स्थिर होतो आहे असे दिसतांच चालू कायदा बदलून रुपयाचा संबंध पुनः सोन्याशी जोडावा; मात्र तो भाव १६ पेन्सांहून ( ७.५३ ग्रेनहून ) कमी असला तरी चालेल, पण त्याहून अधिक मात्र असूच नये.