पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६६ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध पायावर उभा राहूं शकला नाहीं. २४ पेन्सांचा भाव तर कृत्रिम उपायाने देखील टिकूं शकला नाहीं. १८ पेन्सांचा भाव सरकारच्या कृत्रिम कारवाईनें परवांपर्यंत उभा होता. पण त्याला तसा उभा राखण्यांत या देशाचें दरसाल कोट्यवधि रुपयांचे नुकसान होऊन येथील व्यापार व उद्योगधंदे बसले आणि बेकारी वाढली. नाण्यांचा भाव वास्तविक भावाहून चढता ठेवण्यांत आल्यास निर्गत व्यापार बसतो, आयात व्यापार वाढतो आणि देशांत बेकारी वाहूं लागते असा कटु अनुभव आल्याने २०-२५ देशांनी तो नाद सोडून देऊन आपला हुंडणावळीचा भाव आखडता घेतला. हिंदुस्थानला मात्र तसें आर्थिक स्वातंत्र्य नसल्यानें त्यास हा कटु अनुभव अद्यापि भोंवत आहे. तथापि सध्यांची योजना तात्पुरतीच असल्याने ती बदलून नवा करन्सी ॲक्ट करून हा प्रश्न तडीस लावतां येईल. सध्यांची वावटळ एक-दोन महिन्यांत शांत होईल आणि त्यानंतर नवा कायदा करण्याची संधि मिळेल; मात्र तोपर्यंत सरकारने १८ पेन्सांचा भाव टिकविण्याच्या निमित्तानें येथला अगर विलायतेंतला सुवर्णनिधि फस्त करून टाकूं नये एवढी दक्षता घेणें जरूर आहे. एक रुपया = ७.५३ ग्रेन सोनें नवा कायदा करतांना रुपयाचा भाव पौंड-शिलिंग-पेन्सांत निश्चित न करतां पूर्वीच्या कायद्याप्रमाणेंच तो सोन्यांत निश्चित करावा. मात्र तो भाव ठरवितांना ११.३ ग्रेन व ८.४७ ग्रेन हे दोन्ही भाव टिकू शकले नाहीत आणि ७-५३ ग्रेन हा भाव बरीच वर्षे टिकून राहिला ही गोष्ट दृष्टीआड करूं नये. ज्या वेळीं चांदीचा भाव दर औंसास २५ पेन्सांपासून ४० पेन्सांच्या दरम्यान होता त्या वेळी १६ पेन्सांचा भाव बिनहरकत टिकूं शकला. १८ पेन्सांचा भाव स्वाभा- विकपणें टिकण्याला चांदीची किंमत दर औंसाला ४० पेन्सांच्या खाली असतां कामा नये. चांदीची इतकी महर्घता १९१७ पासून १९२४ पर्यंतच काय ती होती. त्यानंतर चांदी उतरूं लागली आणि हल्ली तर ती १६-१७ पेन्सांपर्यंत खाली आली आहे. १९२० साली चढलेली ९० पेन्स ही किंमत जशी नैसर्गिक नव्हे तशी इहीं उतरलेली १६ पेन्सांची किंमतहि नैसर्गिक नव्हे. तेव्हां हे अपवाद सोडून दिल्यास यापुढे चांदीची किंमत २० ते २५ पेन्सांच्या दरम्यान राहील असें वाटतें. त्या दृष्टीने पाहिल्यास रुपयाचा भाव १६ पेन्सांहूनहि ( ७.५३ ग्रेन- हून ) कमी धरावा लागेल. परंतु हिंदुस्थान सरकार जर हा भाव १६ पेन्स निश्चित करील, चांदी विक्रीला काढण्याच्या ऐवजी चांदी खरेदी करून नवें चलन पाडूं लागेल आणि सध्यांची नाण्याची टंचाई दूर करील तर व्यापार व उद्योगधंदे यांची वाढ होऊं लागून चांदीचा हल्लींचा पडता भाव बराच सावरूं लागेल; तथापि तो ४० पेन्सांच्या वर जाण्याची संभवनीयता नसल्यामुळे रुपयाचा भाव १८