पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी चलनाचा सोन्याशीं घटस्फोट २६५ सोन्याच्याच किंमतींत चढउतार झाल्यास आजची अडचण पुढेंहि कायमच राहील खरी, पण ती अस्थिरता जशी हिंदुस्थानला तशीच अमेरिकेला, जपानला व जर्मनीलाहि लागूं आहे. तेव्हां ती अस्थिरता एकट्या हिंदुस्थानला बाधक होऊं शकणार नाहीं. रुपयाचा भाव सोन्यांत ठरवावा रुपयाचा भाव सोन्यांत ठरविणे योग्य व आवश्यक असले तरी तो किती ठरवावा हें आतां पाहूं. १८९७ पासून १९२० पर्यंत तो भाव ७.५३ प्रेन ( १६ पेन्स ) होता; पुढे १९२० सालीं तो ११.३ ग्रेन ( २४ पेन्स ) करण्यांत आला; पण तो एक महिना देखील टिकला नाहीं. पुढे १९२१ पासून १९२७ पर्यंत कागदोपत्री भाव ११.३ प्रेनच कायम असला तरी व्यवहारांत तो भाव ११.३ वरून उतरत उतरत ७ ५३ ग्रेन ( १६ पेन्स) जवळजवळ येऊं लागला होता. पण तितक्यांत इंग्लंडची स्वार्थबुद्धि अनावर होऊन इंग्लंडच्या सांगण्यावरून हिंदुस्थान सरकारनें चलन आंखडण्यास सुरुवात केली आणि हिल्टन यंग कमि- शनपुढे रुपयाचा भाव ८.४७ ग्रेन (१८ पेन्स) च्या आसपास घुटमळत आहे असा भास उत्पन्न केला आणि त्या कमिशननेंहि सिद्ध-साधकपणा करून तोच भाव ( १८ पेन्स) ठेवावा असा निर्णय दिला. महायुद्धानंतर २० राष्ट्रांनी आपल्या नाण्याचा भाव पूर्वीपेक्षां कमी केला; ९ राष्ट्रांनी तो पूर्वीइतकाच ठेवला आणि एकट्या हिंदुस्थानवर मात्र तो पूर्वीपेक्षां १२३ टक्के वाढवून लादला गेला ! यावरून ही गोष्ट किती अन्यायाची, जुलुमाची व नुकसानीची झाली असेल तें वाचकांच्या लक्षांत येईल. असो. १९२७ पासून आजतागायत रुपयाचा हा १८ पेन्स भाव आपल्या पायावर केव्हांहि उभा राहूं शकला नाहीं. नवें नाणें पाडणें बंद करणें, असलेलें नाणें आंखडणें, परत हुंड्या विकणें इत्यादि कृत्रिम उपायांच्या कुबड्या देऊन सरकारनें हें सोंग गेली दोन-तीन वर्षे कसेंबसे उभे करून ठेवलें होते. पण त्याला सध्यांच्या जागतिक आर्थिक वावटळीत थोडीशी झुळूक लागतांच तें सोंग कोलमडून खाली पडलें ! आपल्या आवडत्या १८ पेन्सांच्या (८.४७ ग्रेन) सोन्याच्या भावाची अशी फटफजिती झालेली पाहतांच भारतमंत्री त्याच्या साहाय्यास धावून आले; आणि १८ पेन्सांच्या सोन्याच्या भावाचें सोंग परत उमें करणें अशक्य आहे असे पाहून त्यांनी त्याच्या जागी १८ पेन्सांच्या इंग्लिश नाण्याच्या किंमतीचा तोतया उभा केला ! भारतमंत्र्यांनींच ही धूळफेंक केली म्हणून ते कायद्याच्या कचाटींत येऊं शकत नाहीत; एरवीं कोणी खाजगी व्यवहारांत असा करारभंग केला असता तर त्याला त्याबद्दल प्रायश्चित्त मिळालेच असतें. असो; हुंडणावळीच्या भावाचा १८९३ पासूनचा इतिहास पाहतां एक गोष्ट निश्चित आहे कीं, रुपयाचा १६ पेन्सांहून अधिक भाव केव्हांहि आपल्या