पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६४ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध अशक्य आहे हें यावरून वाचकांच्या लक्षांत आलेच असेल. त्याचप्रमाणे रुपयाचा भाव कांहीं तरी निश्चित न करतां तो कायमचाच अनिश्चित ठेवणें, म्हणजे सुवर्ण- चलनाचा संबंधच तोडून कायमचें रौप्यचलन स्वीकारणे, हे आंतरराष्ट्रीय व्यापा- राच्या दृष्टीने किती गैरसोयीचें आहे तेंहि सहज कळण्याजोगे आहे. अशा स्थितीत रुपयाचा भाव कायद्यानें सोन्याशी किंवा सोन्याच्या एखाद्या नाण्याशी जोडून देणेंच सोयीचें व हितपरिणामी ठरतें. पण त्याचा अर्थ असा नव्हे कीं, महायुद्धा- सारखें अकल्पित संकट ओढवले किंवा सध्यांच्या जागतिक आर्थिक संकटासारखा प्रसंग आला तरी त्या वेळी देखील आपण पूर्वी ठरविलेल्या भावाला चिकटूनच बसावें व नुकसान सोसावे किंवा बॅबिंग्टन स्मिथ कमिटीप्रमाणे घिसाडघाई करून कांहीं तरी भलताच भाव ठरवावा व तो पांचसात महिने देखील टिकूं नये ! पाण्यांतील नांव कांठावरच्या झाडाला बांधून ठेवणें युक्त खरें, पण जेव्हां वाव- टळीनें तीरावरची झाडेंच मुळासकट उपटली जातात की काय अशी स्थिति वाटत असेल तेव्हां ती वावटळ शांत होईपर्यंत किंवा निदान तीरावरच्या अनेक झाडांतून कोणतें झाड तग धरूं शकेल तें निश्चित कळेपर्यंत तरी थांबणेंच श्रेयस्कर होईल. १९२१ पासून १९२७ सालापर्यंत हिंदी चलन असेंच सुटे होते; पण त्यामुळे व्यव- हार कांहीं बंद पडला नाहीं. सध्यां हिंदी चलनाची इंग्लंडांतील पौंडाशी सांगड घालण्यांत आली आहे; पण जेथें स्वतः पौंडच जागेवर स्थिर नाहीं तेथें हिंदी चलन पौंडाशी बांधले गेल्यानें स्थिर राहील असे मानणें वेडेपणाचें नव्हे काय ! असल्या परावलंबी अस्थिरतेपेक्षां स्वावलंबी अस्थिरता अधिक हानिकारक असूं शकत नाहीं. इंग्लंडचें तहूं पुढें दामटलें रुपयाची आंतरराष्ट्रीय किंमत स्थिर करण्याच्या दृष्टीने त्याचा पौंडाशी संबंध जोडणें कसें निरुपयोगी आहे तें वरील विवेचनावरून व्यक्त झालेच आहे. अर्थातच रुपयाचा भाव सोन्याशींच निगडित करावा, हे ओघानेंच प्राप्त होतें. पौंडाचा भाव जसा चंचल आहे तसा सोन्याचाहि भाव तूर्त चंचलच आहे. तेव्हां हिंदी चलनाची नांव सोन्याच्या खुंटाला बांधली काय अथवा पौंडाच्या झाडाला बांधली काय दोन्ही सारखेंच, असे कित्येकांना वाटण्याचा संभव आहे. परंतु सोन्याची किंमत जितकी लवकर स्थिर होईल तितकी पौंडाची किंमत लवकर स्थिर होणार नाहीं. शिवाय पौंडाशी संबंध जोडल्यानें नुसत्या इंग्लंडच्या व्यवहारापुरती स्थिरता येणार; परंतु अमेरिकेशीं, जपानशीं, जर्मनीशी व्यवहार करावयाचा झाल्यास त्यांत अनिश्चितता निश्चित आहे ! मग यांत सरकारने साधलें काय, तर इतर राष्ट्रांना अन्यायानें बाजूस सारून इंग्लंडचें तडू पुढे दामटलें ! ही कारवाई इंग्लंडच्या हिताची असेल; पण इंग्लंडला असा व्यापाराचा जणुं काय मक्ता देण्यांत हिंदु- स्थानचें नुकसानच आहे. उलटपक्षी रुपयाचा भाव सोन्यांत ठरविल्यानंतर पुनः ▼