पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी चलनाचा सोन्याशीं घटस्फोट २६३ होता. पण १९१७ साली चांदीचा भाव दर औंसास ४४ पेन्सांच्या वर गेला. १९१९ साल तर तो ६६ पेन्सांच्याहि वर गेला. १९२० च्या फेब्रुवारींत तो ९० पेन्सांच्या जवळजवळ जाऊन चांदीच्या महर्घतेची परमावधि झाली, आणि सर- कारास चांदीचें नाणें पाडणें अशक्य झालें. दोन्ही कमिट्यांचीं चुकीचीं अनुमानें चांदीचा भाव दर औंसास ४४ पेन्सांपर्यंत असेल तर रुपयाचा भाव १६ पेन्स हा परवडतो; आणि तोच भाव ६६ पेन्सांपर्यंत चढल्यास रुपयाचा भाव २४ पेन्स ठेवला तर रुपये पाडणें सरकारला परवडतें. १९२० साली तर चांदीची दर औंसाची किंमत ९० पेन्सांपर्यंत चढली. इतक्या महागाईची चांदी खरेदी करून रुपये पाडणे सरकारला परवडेना म्हणून सरकारनें सल्ला देण्यासाठी तज्ज्ञांची कमिटी नेमली. त्या कमिटीला असे वाटलें कीं, ही चांदीची महर्घता थोडीबहुत कमी झाली तरी चांदीचा भाव यापुढे ५० ते ६० पेन्सांपर्यंत राहील; म्हणून बॅबिंग्टन स्मिथ कमिटीनें रुपयाच्या हुंडणावळीचा भाव २४ पेन्स ठरवावा असा सहा दिला, आणि हिंदुस्थान सरकारनें दूरवर विचार न करतां, आणि त्याच कमिटींतील हिंदी तज्ज्ञ दादीबा दलाल यांचा इशारा न मानतां, रुपयाचा हुंडणा- वळीचा भाव २४ पेन्स ठरवून टाकला. पण बॅबिंग्टन स्मिथ कमिटीचा अंदाज सप- शेल चुकीचा ठरून चांदीची किंमक ९० पेन्सांवरून घसरत घसरत खाली आली, आणि १९२७ साली ती ३० पेन्साला येऊन पोंचली. अशा वेळी ही किंमत पुनः जास्तीत जास्त चढली तरी ४४ पेन्सांच्यावर जाणार नाही अशी खात्री बाळगून रुपयाचा भाव १६ पेन्स ठरविणें श्रेयस्कर ठरलें असतें आणि सर पुरुषोत्तमदास यांनीं तसा अभिप्राय दिलाहि होता. परंतु हिल्टन यंग कमिशनांतील बहुमत त्यांच्या विरुद्ध पडून १९२७ साली रुपयाचा भाव १८ पेन्स ठरविण्यांत आला; म्हणजे चांदीची किंमत पुनः चढून दर औंसास ४०-४५ पेन्सपर्यंत गेली तरी रुपये पाडण्यांत सरकारचें नुकसान होऊं नये असा यांतला हेतु स्पष्ट दिसला. परंतु बॅबिंग्टन स्मिथ कमिटीचें १९२० सालचें अनुमान जसें चुकीचें ठरलें तसेंच हिल्टन यंग कमिटीचें अनुमानहि चुकीचें ठरलें, आणि चांदीचा भाव ३० पेन्सांहून अधिक चढण्याच्या ऐवजी तो उतरतच चालला आणि आजमितीला तर तो १६-१७ पेन्सांच्या दरम्यान आहे. या भावानें रुपयाची वास्तविक किंमत पाहि- ल्यास ती अवघी सहा पेन्स ठरेल, आणि हुंडणावळीची किंमत तर १८ पेन्स म्हणजे खऱ्या किंमतीच्या तिप्पट आहे ! रुपयाचा संबंध पौंडाशीं जोडणें अनुचित सोन्याचांदीच्या सापेक्ष भावांत अशा प्रकारें हेलकावे बसत असल्यानें वास्त विक किंमत आणि कायद्यानें ठरविलेली किंमत यांच्यांत तंतोतंत मेळ बसणे किती