पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६२ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध १८९३ सालापूर्वी हिंदुस्थानांतील रुपयाची किंमत कोणत्याहि परराष्ट्रीय नाण्याशी कायद्यानें निगडित केली गेली नव्हती. अर्थातच सोन्याचांदीच्या किंमतीच्या फेर- बदलाबरोबर रुपयाहि मार्गेपुढें हेलकावे खात होता. अशी अनिश्चित स्थिति श्रेयस्कर नव्हे असा त्या वेळी अनुभव आल्यावरूनच फौलर कमिटीनें रुपयाचा भाव १६ पेन्स ठरवावा असा निर्णय दिला, आणि त्याप्रमाणे कायद्यानें तो अमलांत आणिला. रुपयाचा भाव त्यांतील शुद्ध चांदीच्या भावावर अवलंबून न ठेवतां काय- यानें तो १६, १८ अगर २४ पेन्स ठरविणे म्हणजे आपल्या नाण्यावर मुद्दाम कृत्रिमतेचा शिक्का मारण्यासारखेच आहे. परंतु जोपर्यंत आपल्या देशांतले नाणें इतर देशांतील नाण्यांहून भिन्न धातूचें आहे, म्हणजे जगांतील बहुतेक सर्व प्रमुख राष्ट्रांतल्याप्रमाणें जोपर्यंत आपण आपल्या देशांत सोन्याचें नाणें कायदेशीर चलन म्हणून सुरू करूं शकत नाही, तोपर्यंत परराष्ट्रांशी व्यवहार करण्यासाठी आपल्या चांदीच्या रुपयावर कोणत्या तरी सोन्याच्या नाण्याचा अदृश्य शिक्का मारून ठेवणें प्राप्तच आहे. फार तर काय, परंतु ज्या दोन राष्ट्रांमध्ये सोन्याचेंच पण भिन्न वजनामापाचें नाणें प्रचलित असतें, अशा राष्ट्रांस देखील आपापल्या नाण्याच्या भावांत, परराष्ट्रांशी व्यवहार सुकर होण्यासाठी, थोडीशीं कृत्रिमता पत्करावी लागते; मग जेथें चांदीचें नाणें वापरणाऱ्या देशाचा सगळा व्यवहार सोन्याचें नाणें वापरणाऱ्या देशांशीं चालावयाचा तेथे कायद्यानें कृत्रिम किंमत ठरवावी लागल्यास नवल काय ? चांदीचा चढता भाव वरील विचारसरणीवरून आपल्या देशांतील नाण्याची किंमत परराष्ट्रांतील नाण्यांत ठरवून ठेवण्याची आवश्यकता सिद्ध झाली तरी ती कृत्रिम किंमत नैसर्गिक किंमतीहून फारशी भिन्न असतां कामा नये हे उघड आहे. चलनी रुपयांतल्या चांदीची किंमत १२ पेन्स देखील नसतां त्याची पौंडाशी सांगड जोडतांना जर आपण १८ पेन्स किंवा २४ पेन्स किंमत कायद्याने ठरवून ठेवली तर ती स्थिर राहूं शकत नाहीं, व सगळे व्यवहार अतिकृत्रिम घोटाळ्याचे व नुकसानीचे होतात. फौलर कमिटीनें रुपयाचा भाव १६ पेन्स ठरवावा असा अभिप्राय दिला त्या वेळी रुपयांतील चांदीची किंमत १६ पेन्सांहून बरीच कमी होती खरी; पण ती १६ पेन्सांच्या थोडी जवळ येण्याचा संभव होता, आणि तशी ती कालांतराने आली म्हणूनच १८९८ पासून १९१७ पर्यंत वीस वर्षे आपल्या देशांत हल्लीं- सारखा हुंडणावळीचा घोटाळा उपस्थित झाला नाहीं. महायुद्धाच्या कालांत चांदी अतोनात महाग झाली; त्यामुळे १६ पेन्सांचा भाव टिकणे अशक्य झालें. चांदीचा दर औंसाचा भाव ४४ पेन्सांच्या आंत होता तोपर्यंत चांदीचें नाणें पाडण्यांत व दर पौंडास १५ रुपयेप्रमाणें मोबदला देण्यांत सरकारला नफा होत