पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी चलनाचा सोन्याशीं घटस्फोट २६१ पाठविले असतां अमेरिकेंतून १०० डॉलर किंवा तितका माल मिळत असे, किंवा जपानांत १३० रुपये पाठविले असतां तेथले १०० येन किंवा तितक्या किंमतीचा माल मिळे. आतां रुपया हा जर पौंडाचा वा हिस्सा मानला जाऊं लागला आणि पौंडाची किंमत उतरून जर पाऊणपट झाली तर त्या पौंडाचा संसर्ग रुपयालाहि बाधून अमेरिकेंत किंवा जपानांतहि रुपयाची किंमत पाऊणपटच मानण्यांत येणार ! आणि पौंडाचीहि किंमत याच्याहि खाली उतरून निम्मीच झाली तर रुपयाचीहि किंमत निम्मीच होणार ! ही आपत्ति आतांच जाणवू लागली आहे. मुंबई- हून न्यूयॉर्कचे १०० डॉलर घेण्यास पूर्वीच्या २७० च्या ऐवजी आतां ३७६ रुपये आणि जपानचे १०० येन घेण्यास पूर्वीच्या १३० च्या ऐवजी आतां १८६ रुपये पडूं लागले आहेत ! आठ दिवसांपूर्वी आमच्या रुपयांत जितकी चांदी होती तितकीच आजहि असून ज्या डॉलरांना पूर्वी २७० रुपये द्यावे लागत असत, त्यांनाच पूर्वी- च्याच आकाराचे व वजनाचे ३७६ रुपये द्यावे लागावे हा परिणाम कशाचा ! तर सर सॅम्युअल होअर यांच्या अत्याचाराचा ! हिल्टन यंग कमिटीनें रुपयाचा संबंध पौंडाशी जोडणें श्रेयस्कर नव्हे असा स्पष्ट अभिप्राय दिला होता, आणि रुपयाची सोन्यांत किंमत ठरवून त्याला थोडीशी तरी स्वतंत्रता दिली होती. अशा रीतीनें १९२७ च्या करन्सी ॲक्टाने रुपयांचा ठरविलेला कायदेशीर भाव स्टेट सेक्रेटरी हे असेंब्लीला न विचारतां आपल्याच शब्दानें कसे बदलू शकतात ? अर्थातच स्टेट ·सेक्रेटरींनी हा बेकायदेशीर अत्याचारच केला व इंग्लंडच्या बुडणाऱ्या पौंडाशी हिंदी चलनाची सांगड जोडून त्यालाहि जलसमाधि देण्याला ते तयार झाले ! हा अत्या- चार थांबवून रुपयाची सांगड पुनः सोन्याशी कशी घालावी आणि सध्यांच्या सोन्याचांदीच्या परिस्थितीत रुपयाचा भाव ७.५३ ग्रेन ठरवावा का ८.४७ ग्रेन •ठरवावा का याहून निराळाच कांहीं ठरवावा, याचा विचार पुढील लेखांत करूं. ( उत्तरार्ध) फौलर कमिटीचा निर्णय राष्ट्राराष्ट्रांमधील देवघेवीचे व्यवहार निर्धोकपणें चालण्यास आणि दीर्घ- कालीन करार निश्चितपणे करतां येण्यास प्रत्येक देशांतील चलनाचा भाव काय- यानें कोणत्या तरी एका स्वरूपांत निश्चित केला पाहिजे हें तत्त्व सर्वोसच मान्य आहे. आजच्या हिंदी चलनाचा भाव असा निश्चित न करतां तो वाऱ्यावर हेल- कावे खात सोडल्यास आणखी किती खाली घसरत जाईल याची इतरांस तादृश कल्पना नसल्यास निदान तज्ज्ञांस तरी त्याची कल्पना चांगली आहे. ( केसरी, दि. ३ आक्टोबर १९३१ )