पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६० श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध रुपया हा पौंडाचा वा हिस्सा आहे असें न म्हणतां एका रुपयाबरोबर ८.४७ प्रेन सोनें असें कोष्टक ठरवून टाकलें. हिंदी शेतकन्यांचे नुकसान १८९८ च्या कायद्यानें रुपयाची किंमत व पौंड म्हणजे ७.५३ ग्रेन ठरविली होती ती १९२७ च्या कायद्यानें ८.४७ ग्रेन म्हणजे पौंड ठरविली. याचाच अर्थ पूर्वी एक हजार पौंडांचा माल विलायतेस पाठविला असतां जे १५०० रुपये शेतकऱ्यांस मिळत असत ते या नव्या भावानें १३३३१ मिळू लागले ! अशा रीतीनें हिंदुस्थानचे शेतकरी व कारखानदार यांचें नुकसान होऊं लागलें. उलटपक्षी विलायतेहून येणारा माल इकडे स्वस्त पडूं लागला खरा, परंतु हिंदु- स्थानचा निर्यात व्यापार केव्हांहि आयात व्यापारापेक्षा अधिक असल्यानें दोहोंची वजावाट होअन बाकी जे रुपये हिंदुस्थानास मिळावयाचे ते कमी मिळू लागले. हें एक नुकसान झालेंच, पण शिवाय सरकारचा शेतसारा व इतर कर हे पूर्वीच्या भावानें ठरलेले असून नव्या भावानें ते भरणें जड जाऊं लागलें; तरी देखील ते कमी न केल्यामुळे तिकडूनहि अन्याय झाला व नुकसान होत आहे. उलटपक्षी विलायतेला पैसे पाठविणाऱ्या नोकरशाहीची मात्र चंगळ झाली आहे ! अशा रीतीनें १९२७ सालच्या करन्सी अॅक्टानें या देशाचें दुहेरी नुकसान केले असले तरी या कायद्यानें रुपयाचा संबंध पौंडाशीं न जोडतां सोन्याशी जोडला या योगानें त्यांतला अर्धा-अधिक कृत्रिमपणा कमी झाला. सोने-चांदी यांच्या भावांत चलबिचल झाल्याने काय नुकसान व्हावयाचें तें झालें खरें; पण पौंडाशीं संबंध जोडल्यानें पौंडाचा भाव उतरला की रुपयाचा भाव उतरला, पौंड बुडाला की त्याबरोबर रुपायालाहि जलसमाधि मिळाली, अशी निष्कारण परावलंबी आपत्ति यावयाची ती तरी आतांपर्यंत टळली होती; परंतु आमच्या नव्या साम्राज्यवादी भारतमंत्र्यांना तेंहि पाहवेना. त्यांनी बेजबाबदारपणे व अनधि- काराने असे जाहीर टाकलें कीं, १९२७ च्या कायद्यानें जो रुपयाचा संबंध सोन्याशीं जोडला होता तो तोडून यापुढे त्याचा संबंध पौंडाशी जोडण्यांत आला आहे व हा संबंध कायम करण्याकरितां सरकार शक्य ते प्रयत्न करील ! नव्या फर्मानानें ओढवणारी आपत्ति या नव्या महंमद तघलघी फर्मानानें कोणकोणती आपत्ति ओढवणार तें पाहा. पूर्वीच्या करन्सी अॅक्टानें एक रुपया म्हणजे ८.४७ प्रेन सोनें असा भाव ठरलेला असल्यानें इंग्लंडचा पौंड तरला किंवा बुडाला तरी अमेरिका, जपान, फ्रान्स, जर्मनी, इटली वगैरे देशांतल्या सराफ कट्ट्यावरचा हिंदी रुपयाचा भाव कायमच राहत असे. म्हणजे इंग्लंडच्या एका पौंडाला न्यूयॉर्कमध्ये ४.८४ डॉलर मिळोत किंवा त्याच्या पाऊणपट ३.६३ डॉलर मिळोत, हिंदुस्थानांतून २७० रुपये