पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी चलनाचा सोन्याशीं घटस्फोट २५९ आणखी अधिक उतरूं नये व शक्य तर परत ४.८४ डॉलर्सपर्यंत चढावी अशी इंग्लंडची धडपड चालू आहे, व त्याचकरितां इंग्लंडला हिंदी गंगाजळीतलें सोनें मिळाल्यास हवें आहे. रुपयाचा भाव स्थिर करण्याचा यत्न कंपनी सरकारचें राज्य हिंदुस्थानांत स्थिर झाल्यावर कंपनीनें १८५२ सालीं हिंदुस्थानांतलें सोन्याचें नाणें बंद करून चांदीचें नाणेंच येथे कायदेशीर चलन ठरविलें. हिंदुस्थानांतलें नाणें चांदीचें व व्यवहार तर मुख्यतः इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, जपान इत्यादि सोन्याचें नाणें वापरणाऱ्या देशांशीं ! अशा स्थितींत सोन्या- चांदीच्या भावांत बदल झाल्यानें हिंदुस्थानांतील रुपयांचा भाव इतर देशांत वारं- बार बदलणे स्वाभाविक आहे, आणि अशा फेरबदलांमुळे व्यापारास तर मोठा धोका येतो. म्हणून हिंदुस्थान सरकारने १८९३ सालापासून येथील रुपयाचा हुंडणावळीचा भाव कायद्यानें ठरवून टाकण्याचा क्रम सुरू केला. पांच वर्षे टिपणें पाद्दतां पाहतां अखेरीस सरकारनें १८९८ साली हिंदुस्थानांतील रुपयाचें पौंडाशीं लग्न लावून टाकलें ! हिंदी रुपया म्हणजे पद पौंड. अर्थातच एका पौंडाबरोबर १५ रुपये म्हणजेच एका रुपायास १६ पेन्स असे हे प्रमाण कायद्यानें निश्चित केले. इंग्लिश पौंड = ४.८४ डॉलर्स हा भाव नैसर्गिक आहे, कारण दोन्ही नाणीं सोन्याचींच आहेत; परंतु इंग्लिश पौंड = हिंदी १५ रुपये हा भाव कृत्रिम आहे. सोन्याचा भाव दर तोळ्यास २४ रुपये असा राहिला तर मात्र एका पौंडास १५ रुपये हा भाव नैसर्गिक ठरतो; पण सोन्याची किंमत २४ हून अधिक झाली किंवा उतरली तर तो भाव कृत्रिम ठरतो. १८९८ सालापासून १९१७ सालापर्यंत सोन्याचा भाव २४ रुपये तोळा असाच स्थिर राहिल्यामुळे एका रुपयास १६ पेन्स हा कायद्यानें जोडलेला संबंध कृत्रिम असून देखील नैसर्गिकच भासूं लागला. पण महायुद्धाच्या वावटळींत चांदी महाग झाल्यामुळे हा भाव टिकेना. तेव्हां १९२० साली सरकारने कायदा बदलून रुपयास २४ पेन्स म्हणजे एका पौंडास २० रुपये असा संबंध नव्या कायद्यानें ठरविला. पण चांदीच्या भावानें पुनः उलट खाल्ली ! सोनें पुनः महाग होऊं लागलें. तेव्हां तो भाव टिकविण्याच्या नांवाखाली, पण वस्तुतः इंग्लिश धनि- कांची धन करण्यासाठी, हिंदुस्थानांतल्या ठेवींतले ४०-५० कोटि रुपये व्यर्थ नासल्यावर सरकारनें हिंदी रुपया व ब्रिटिश पौंड यांचा घटस्फोट केला ! तथापि या दोनहि नाण्यांचा नित्य येणारा संबंध टाळणे अशक्य असल्यामुळे त्या संबंधाला कायदेशीरपणा कसा आणावा याचा विचार करण्यासाठी १९२५ सालीं हिल्टन यंग कमिशन नेमण्यांत आले. त्या कमिशननें हिंदी रुपयाचा संबंध पूर्वीसारखा इंग्लिश पौंडाशी न जोडतां सोन्याशीं तो संबंध जोडून दिला म्हणजे हिंदी