पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५८ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध डांतील पौंडाच्या कागदी चलनाशी जोडण्यानें हिंदुस्थानवर मोठीच आपत्ति येणार आहे. पौंडाचा भाव नुकताच ढासळला हल्लल्या युगांत राष्ट्राराष्ट्रांचे आर्थिक संबंध एकमेकांशी इतके निगडित झालेले असतात की, कोणत्याहि एका राष्ट्राला इतर राष्ट्रांतून जे कोणतें नाणें वापरले जात असेल त्याची आपल्या नाण्यांत किंमत आजमितीला किती आहे याची नित्य चौकशी केल्याविना गत्यंतर नाहींसें झालें आहे. एका देशांतील नाण्यांत ठरणारा जो भाव तोच एक्स्चेंजचा (हुंडणावळीचा ) भाव. हा भाव अनेक कारणांनी वारंवार बदलत असतो. दोनहि देशांत सोन्याचेंच चलन असले तरी त्या त्या देशांतील सोन्याच्या संग्रहाच्या कमजास्तपणामुळे तो भाव कमजास्त होतो. मग जेथे एका देशांतलें नाणें सोन्याचें व दुसऱ्या देशांतलें चांदीचें असा फरक असेल तेथें ही चलबिचल किती होत असेल याची कल्पनाच करावी ! तथापि अशी चलबिचल रोजच्या रोज होत गेल्यास परस्परांमधील देव- घेवीस, व्यापारास व दीर्घकालीन करारास मोठीच अडचण पडते. याकरितां प्रत्येक देशाचें सरकार आपल्या नाण्याचा भाव इतर राष्ट्रांत स्थिर राहील अशी कांहीं तरी योजना कायद्यानें वा अन्य मार्गानें करून ठेवतें. उदाहरणार्थ, इंग्लंडचें जें पौंडाचें नाणें आहे त्यांत ११३ ग्रेन शुद्ध सोनें असावें असा निर्बंध आहे. त्याच- प्रमाणें अमेरिकेंतला जो सोन्याचा डॉलर आहे त्यांत २३.३२ ग्रेन शुद्ध सोनें असतें. हीं दोनहि नाणीं सोन्याचींच असून त्यांतील सोन्याचें प्रमाणहि स्थिर असल्याने एका पौंडाला ४.८४ अमेरिकन डॉलर्स मिळावे हा नैसर्गिक भाव ठरतो. पण प्रत्यक्ष व्यवहारांत सोन्याची नाणी वापरण्यांत येत नसून कागदी चलनावरच व्यवहार भागविण्यांत येतो. अशा वेळी कागदी चलनाचा मोबदला देण्याइतकें सोनें कोणत्याहि एका देशांत नसले व तसा बोभाटा बाहेर झाला की त्या देशाच्या नाण्याचा परदेशांतला हुंडणावळीचा भाव उतरतो व त्या मानाने दुसऱ्या नाण्याची त्या देशांत भाव चढतो. महायुद्धापूर्वी इंग्लिश पौंड व अमेरिकन डॉलर यांचा भाव १ = ४.८४ हा स्थिर होता. महायुद्धांत इंग्लंडचें सोनें कमी झालें, देणें वाढलें आणि इंग्लंडची पत कमी झाली, त्यामुळे इंग्लंडच्या पौंडाला अमेरिकेंत ४.८४ डॉलर्स भाव येईनासा झाला. पण युद्ध संपवून पांच-सहा वर्षे होतात न होतात तोंच इंग्लंडनें आपली घडी कशीबशी बसवून आपल्या पौंडाची पत वाढविली आणि न्यूयॉर्कच्या सराफकट्ट्यावरचा इंग्लिश पौंडाचा भाव ४.८४ डॉलर्स स्थिर केला. हा भाव गेल्या दोन महिन्यांपूर्वीपर्यंत तसाच स्थिर राहिला होता. पण इंग्लंडच्या बजेटाची दिवाळखोरी चव्हाट्यावर आली व मंत्रिमंडळांतहि घालमेल झाली, त्या- बरोबर हा भाव ढांसळला आणि आजमितीला न्यूयॉर्कच्या सराफकट्ट्यावर इंग्लिश पौंडाची किंमत ३.६० डॉलर्स म्हणजे पूर्वीच्या पाऊणपट झाली आहे. ही किंमत