पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी चलनाचा सोन्याशीं घटस्फो गरजवंता 'न्यायनीति' नाहीं 'गरजवंता अक्कल नाहीं' अशी म्हण आपल्या भाषेत रूढ आहे. ही म्हण तितकीशीं वस्तुस्थितिदर्शक नाहीं. गरजवंतांना अक्कल नसते किंवा अस लेली जाते हैं खरें नसून उलट 'गरज ही तर अकलेची खाण आहे' अशी जी इंग्रजीत म्हण आहे ( Necessity is the mother of invention ) तीच अधिक समर्पक आहे. अर्थातच गरजू माणूस अकल चालवून कांहीं तरी शकल शोधून काढतो; पण त्यांत न्यायनीति मात्र पाहात नाहीं. तेव्हां 'गरजवंता अक्कल नाहीं' असे म्हणण्यापेक्षां 'गरजवंता न्यायनीति नाही' असें म्हणणे अधिक यथार्थ ठरेल. २५७ इंग्लिश मुत्सद्द्धांची सध्यां अशीच स्थिति झाली आहे. इंग्लंडांतील सोन्याचा ओघ परराष्ट्राकडे जोराने वाहूं लागून देशांतील गंगाजळी कोरडी होते असे वाटू लागतांच गरजू माणसाप्रमाणें इंग्लंडची स्वार्थी दृष्टि हिंदुस्थानच्या गंगाजळीकडे वळली. हिंदुस्थानच्या मालकीचे सोनें आपल्याला कसें राजरोस वापरतां येईल याविषयीं डोकें खाजवून भारतमंत्र्यांनी अजब युक्ति शोधून काढली आणि हिंदी चलनाचा सोन्याशीं घटस्फोट करून इंग्लंडांतील पौंडाशीं त्याचा पाट लावून दिल्याचें जाहीर केलें ! इंग्लंडांतील कागदी चलनाच्या मोबदला सोनें देण्याचा कायदा तूर्त रद्द केल्याचें तेथें जाहीर होतांच हिंदी फडणविसांनी येथेंहि सोनें देण्याची आपली जबाबदारी तहकूब केल्याचे जाहीर केलें होतें. परंतु मागाहून भारत- मंत्र्यांच्या हुकुमावरून सोन्याच्या विक्रीवर नियंत्रण ठेवणारा नवा वटहुकूम प्रसिद्ध करण्यांत आला. त्यांत सरकारी खजिन्यांतलें सोनें इंपीरियल बँकेमार्फतच मिळेल, तें २५ हजार पौंडांहून अधिक मागितले तरच मिळेल आणि तेंहि ठराविक बँकांना ठराविक कामासाठींच मिळेल अशा अनेक अडचणीच्या अटी लादल्या. त्यांचा इत्यर्थ हाच कीं, इंग्लंडशीं व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांची तेवढी सोय होईल; पण इतरांच्या व्यवहाराच्या आड इतक्या अडचणी येतील कीं, नको तो त्रास असें वाटून त्यांस तो व्यवहार सोडावा लागेल. अशा रीतीनें हिंदी गंगाजळींतील सोन्याचा ओघ दुसरीकडे वाहूं नये व त्याचा उपयोग इंग्लंडला मात्र आपल्या इच्छेप्रमाणें करतां यावा, या हेतूनें हें जें नवें फर्मान निघाले आहे, त्यांत हिंदी चलनाचा सोन्याशी संबंध तोडला व यापुढे त्याचा पौंडाशी संबंध जोडला असली भाषा स्पष्ट वापरलेली नाही. पण भारतमंत्री मात्र तिकडे विलायतेंत या घटस्फोटाचा व नव्या पाटाचा डांगोरा पिटीत आहेत; आणि येथील फडणीस सर जॉर्ज र्ास्टर हे ह्याची इनकार करीत नाहींत. यावरून त्यांची या जबरदस्तीच्या अत्याचाराला स्पष्ट संमत्ति नसली तरी ते विरोध करूं इच्छीत नाहीत आणि प्रत्यक्ष कृतीने ते हा अत्याचार चालू देणार असे दिसतें. अशा रीतीनें हिंदुस्थानांतील चलनाचा सोन्याशी असलेला संबंध तोडून तो इंग्लं-