पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५६ ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध आपला अनागोंदी कारभार टाकून टापटीप व हिशेबीपणा उपयोगांत आणला तर त्यांना जपानी मालापुढे हात टेकण्याची पाळी खास येणार नाहीं. हुंडणावळी- मुळे हिंदी गिरण्यांना जो चट्टा बसतो तो विलायतेच्या चढाओढींत, जपानच्या चढाओढींत नव्हे. कारण हुंडणावळीचा भाव हिंदी व जपानी लोकांना सारखाच भोंवतो. असे असून हिंदी गिरणीवाल्यांची मागणी मुख्यतः जपानी मालावर संरक्षक जकात लादण्याविषयी आहे ! अशी जकात लादल्यास गि-हाइकांच्यावर तो एक अप्रत्यक्ष करच बसणार. पण तसा कर बसविण्यापूर्वी हिंदी गिरणीवाले आपले कारखाने सुधारण्याची शक्य तितकी तजवीज करतील अशी हमी सरकारने त्याज- कडून घ्यावयास नको काय ? गिरणीवाल्यांना प्रथम स्वतःच्या पायावर उभे राह- ण्याचा प्रयत्न करूं द्या. तो सफल होतच नाही असे ठरल्यास एवढा मोठा देशी धंदा बुडूं नये म्हणून त्यांचे संरक्षण करणे सरकारचें कर्तव्यच आहे, पण तत्पूर्वी संरक्षणछत्रामुळे गिरणीवाले अधिक ऐदी बनणार नाहींत एवढी तरी खात्री त्यांज- कडून करून घेण्यांत यावी. संरक्षण देणे जरूरच आहे असे ठरल्यास ते आयात जकातवाढीच्या रूपाने यावें का बौंटीच्या मार्गानें द्यावें, का परदेशी जाणाऱ्या कापसावर निर्गत जकात लादून त्या प्रकारानें यात्रें, याविषयींहि साक्षीदारांत एकवाक्यता नाहीं. या तीन उपायांतला कोणता उपाय हितकारक आहे याची चर्चा करणे अगत्याचें आहे; पण तो विचार स्वतंत्र लेखांतच करणे बरें. हिंदी चलनाचा सोन्याशीं घटस्फोट ( पूर्वार्ध) [ जागतिक मंदीच्या वेळी इंग्लंडमधील सुवर्णचलन गडगडलें आणि त्याचा परिणाम हिंदुस्थानासहि भोगावा लागला. त्या वेळीं हिंदी इंपीरिअल बँकेला व हिंदुस्थान सरकारला आपलें चलनविषयक धोरण ठरविण्याला अवधि न देतां भारतमंत्री सर सॅम्युएल होअर यांनी हिंदी चलनाचें सोन्याशीं ठरलेलें प्रमाण रद्द केल्याचें जाहीर केलें. या संबंधांत या लेखांत ऊहापोह केला असून, त्याच्या पुढच्या लेखांत याच विषयाच्या आनुषंगानें रुपयाचें मूल्य परराष्ट्रांतील चलनाशीं केव्हां किती ठरवावें म्हणजे तें स्थिर राहील याची चर्चा केली आहे. ] ( केसरी, दि. २९ सप्टेंबर १९३१ )