पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण द्या पण हमी घ्या २५५ मॅनेजिंग एजन्सीची पद्धति अनिष्ट आहे, पण अलीकडे हे मॅनेजिंग एजन्ट्स् आपल्या एजन्सीला लिमिटेड कंपनीचें स्वरूप देऊन आपल्यावरील जबाबदारी आणखी संकुचित करून भागीदारांचें नुकसान हमखास व्हावें अशी योजना अम- लांत आणीत आहेत. त्याचप्रमाणें हिंदुस्थानांत बारीक धाग्याच्या कापसाची निपज करण्याविषयीं गेल्या ५० वर्षात गिरणीवाल्यांनी कांहींच तजवीज केली नाहीं. कापूस खरेदीतहि चांगल्या व वाईट मालाची भेसळ होऊं देऊं नये आणि कापसाचा भाव मंदीचा असेल त्या वेळी अगाऊ करार करून थेट शेतकऱ्यांकडूनच माल खरेदी करावा अशी जी जपानी एजंटांची वहिवाट आहे तिचें देखील येथील गिरणीवाल्यांकडून अनुकरण होत नाही. एवढेच नव्हे तर कित्येक गिरण्यांचे मॅने- जिंग एजन्ट्स् हे स्वतः कापसाचे सट्टे करणारे असल्याने स्वस्त मिळालेला माल त्यांच्या स्वतःच्या सट्टेबाजीकडे जातो आणि महाग पडलेला माल गिरण्यांच्या गळ्यांत बांधण्यांत येतो असे म्हणतात ! टॅरिफ बोर्डानें अशा एजंटांची माहिती विचारली व ती त्याला खासगी यादीच्या रूपाने देण्यांत आली असें कळतें. असले एजंट भागीदारांचें व कारखान्याचें हित पाहणार आणि आपल्या कारखान्यांत बूड येते म्हणून आयात जकात दुप्पट करा अशी मागणी करणार ! अर्थातच असली मागणी मान्य करण्यापूर्वी असल्या सर्व प्रकारांची शहानिशा झाली पाहिजे. कोणतीहि सुधारणा केली नाहीं अल्प श्रमानें मोठा फायदा मिळू लागला म्हणजे कोणीहि कारखानदार ऐदी व खुशालचेंडू बनतो आणि मग परिस्थिति पालटून संकटांची आंच लागूं लागतांच त्या चटक्यानें घाबरा होऊन धांवा करूं लागतो, तशीच स्थिति या गिरणीवाल्यांची झाली आहे. कापसाच्या लागवडीची सुधारणा करण्याकडे त्यांनी लक्ष पुरविलें नाहीं. ज्या वेळी बेसुमार नफा मिळाला त्या वेळी रिझर्व्ह फंड 2 इमा- रतींची व यंत्रांची वाढ करण्यांत पैसे गुंतवून बसले, हिंदी तज्ज्ञ तयार करवून आणून त्यांना आपल्या गिरण्यांत नेमण्याची तजवीज झाली नाहीं, गिर- `ण्यांच्या यंत्रांना लागणाऱ्या शेंकडों किरकोळ वस्तु देशांतल्या देशांत तयार करविण्याची यत्किंचितहि खटपट करण्यांत आली नाहीं, मजुरांची कार्य- क्षमता वाढविण्याविषयीं प्रयत्न झाला नाहीं, मॅनेजिंग एजंटांच्या कमिशनची पद्धति भागीदारांना व कारखान्याला किफायतशीर होईल अशा रीतीनें सुधारण्यांत आली नाही. असेच प्रकार आणखी किती तरी सांगतां येतील, पण सामान्य वाचकांना साधारणतः कल्पना येण्यास एवढी यादी पुरे आहे. जपानांतील गिरणीवाले आपला सर्व व्यवहार अत्यंत दक्षतेनें, काटकसरीनें व सचोटीनें करीत असल्याने त्यांना येथून कापूस खरेदी करून नेऊन येथल्यापेक्षां स्वस्त माल देणें परवडतें. हिंदी गिरणीवाल्यांनी