पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५४ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध कमी ६०-७० वर्षांचा तरी आहे. एवढ्या कालावधीत या गिरण्यांनी निरनिराळ्या परिस्थितीशीं टक्कर मारून आपला बचाव केला आहे. असे असतां त्यांस आतांच •सरकारी आधाराची गरज कां भासावी ! अनागोंदी कारखानदार टेकीस येतात मुंबई शहरांत गिरण्यांची झपाट्याने वाढ होऊं लागतांच लँकेशायरचें धाबें दणाणून गेलें आणि लिटनशहांनी आपल्या शिक्केबाजीच्या अधिकारांत परदेशी कापडावरील जकात अजिबात काढून टाकली. पण तेवढ्यानें कांहीं हिंदी गिरण्या डबघाईस आल्या नाहीत. १८७८ पासून. १८९६ सालापर्यंत परदेशी कापडावर बिलकूल जकात नसतां आणि पुढे परदेशी कापडावर आयात जकात बसली तेव्हां देशी कापडावरहि एक्साईज ड्यूटी लादल्यानें पुनः संरक्षण नाहीं तें नाहींच, अशी परिस्थिति झाली असतां ज्या हिंदी गिरण्यांनी चढाओढीत कच खाल्ली नाही, त्याच हिंदी गिरण्यांना आजमितीला ११३ टके जकातीच्या •ढालीचा आसरा असतां त्यांची केविलवाणी स्थिति व्हावी आणि ही जकात आणखी १३३ टक्के वाढवा अशी त्यांनी याचना करावी याचें आश्चर्य वाटतें; पण या कोड्याचा उलगडा थोड्याशा विचारानें होण्यासारखा आहे. १८७८ सालापासून १९१४ सालापर्यंत हिंदी गिरण्यांचे प्रतिस्पर्धी लँकेशायरवालेच होते, आणि त्यांचाहि कारभार नबाबी थाटाचाच असून, त्यांच्या मालाच्या मूळ किंमतीत व विक्रीच्या किंमतीत इतकी कूस असे की, हिंदी गिरणीवाल्यांना त्यांतल्या त्यांत कांटेकोरपणा करून स्वतःचें बस्तान बसवितां आलें; परंतु आतां जो नवा प्रति- स्पर्धी भेटला आहे त्याचा कारभार इतका कांटेतोल आहे की, त्याच्याशी चढा- ओढ करतांना अनागोंदी कारभारवाले हिंदी कारखानदार टेकीस येत आहेत. पूर्वी लँकेशायरवाले व मुंबईवाले दोघेहि सारखेच गाफील असल्यामुळे मुंबई- वाल्यांचा निभाव लागला; परंतु जपानी व्यापारी पैन्-पैची कांटकसर करण्याची दक्षता घेत असल्यानें या नव्या चढाओढीत हिंदी गिरणीवाले नामोहरम व्हावेत हैं साहजिकच आहे. सट्टेवाले मॅनेजिंग एजंट्स् परंतु एवढ्यानें त्यांस २५ टक्के संरक्षक जकातीची मागणी करण्याचा हक्क पोंचतो की काय, आणि तितकी जकातीची वाढ करणें गि-हाइकांच्या दृष्टीनें न्याय्य ठरेल की काय याची वानवाच आहे. बहुतेक साक्षीदार स्वतः गिरणीवाले किंवा त्यांचे हस्तक असल्यानें त्यांनी टॅरिफ बोर्डापुढे आपल्या तक्रारींचा ठराविक पाढा वाचला; परंतु स्वतःच्या दक्षतेनें किती सुधारणा करतां येण्याजोगी आहे या विषयीं अवाक्षरहि काढलें नाहीं. तरी पण कांहीं सडेतोड साक्षीदार भेटले आणि त्यांनीं गिरण्यांतील कारभारांतला बोंगळपणा बोर्डाच्या नजरेस आणला. आधींच