पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण द्या पण हमी भ्यां २५३ जपानांत तर ३० वर्षापूर्वी एकहि गिरणी नव्हती. मग हिंदी गिरण्यांना इतका दीर्घकालीन अनुभव असून हिंदुस्थाननें काबीज केलेली बाजारपेठ जपानच्या हातांत कशी गेली? केवळ टुंडणावळीचा हा परिणाम नव्हे आणि हातचा गेलेली बाजारपेठ केवळ जकात वाढविल्याने फिरून हस्तगतहि व्हावयाची नाहीं. पुनश्च ती हस्तगत करण्याला हिंदी गिरण्यांतील कामाची पद्धतिचे आमूलाग्र सुधारली पाहिजे. हिंदुस्थानांतील बहुतेक सर्व गिरण्यांची व्यवस्था 'मॅनेजिंग एजन्ट्स् 'कडे असते. ही मॅनेजिंग एजंट्सची पद्धति जगाच्या पाठीवर इतरत्र कोठेंहि नाही, कारण ही पद्धति कोणत्याहि धंद्याच्या अपकर्षालाच कारणीभूत होते असा तज्ज्ञांचा अनुभव आहे. मॅनेजिंग एजंट्स् हे वस्तुतः डायरेक्टरांचे नोकर असून इकडे तेच इतके शिरजोर बनलेले असतात की, डायरेक्टर्स मॅनेजिंग एजंटाला काढून टाकूं शकत नाहींत. उलटपक्षी मॅनेजिंग एजंट्सच डॉयरेक्टरां- वर वरचष्मा चालवीत असतात. अशा रीतीने मॅनेजिंग एजंट्स हे सर्व सत्ताधारी बनतात आणि त्यांच्या अनियंत्रित कारभारामध्ये हात घालण्यास कोणीहि धजावत नाहीत. मॅनेजिंग एजंटांची ही अनियंत्रित सत्ता आणि गिरणीचें दिवाळे निघ- ण्याची वेळ येऊन ठेपली तरी एजंटांच्या कमिशनमध्ये खंड न पडणें इत्यादि कारणांमुळे या जगाच्या चढाओढींत आपला टिकाव लागेल अशा प्रकारची या धंद्यांत सुधारणा करण्याची त्यांना गरजच भासली नाही. पण आतां जपानसारखें ताज्या दमाचें आणि हरहिकमतीचें नवें राष्ट्र प्रतिपक्षी म्हणून दंड ठोकून उभें राहिल्यापासून हे गिरण्यांचे चालक जागे झाले आहेत आणि हल्लीं जो संरक्षक जकातीची लाट चोहोंकडे पसरत आहे त्या वाहत्या गंगेत हात धुवून घेऊन पुनः निर्धास्त व्हावे असा त्यांचा मनोदय आहे. आतां सरकारी आधार कशासाठीं ? कोणत्याहि धंद्याला संरक्षण देण्याचा विचार ठरविण्यापूर्वी त्या धंदेवाल्यांनीं आपल्या परिश्रमानें तो धंदा चालविण्याची पराकाष्ठा केली आहे आणि स्वाव लंबनाने योजावयाचा कोणताहि उपाय करून पाहण्यांत हयगय झालेली नाहीं, अशी बोर्डाची खात्री पटली तरच बोर्डाकडून संरक्षणाच्या उपायांची शिफारस केली जाते व इतकी दक्षता आवश्यकच आहे. टाटा कंपनीच्या पोलादाच्या कारखान्याला सरकारी आश्रय देण्यापूर्वी त्या कंपनीचा कारभार काटकसरीने चालला आहे का नाही याविषयी शंका उपस्थित झाली होती. तिचें पूर्णपणे निर- सन होण्यापूर्वीच त्या कंपनीला संरक्षणाचा फायदा मिळाला. याचे कारण पोला- दाचा हा कारखाना नवाच असून सर्व हिंदुस्थानांत तो एकच एक असल्याने इतकी सूक्ष्म चिकित्सा करणें त्या वेळी इष्ट वाटले नाहीं; परंतु कापडाच्या हिंदी गिरण्यांची तशी स्थिति नाहीं. यांतील जुन्यांत जुन्या गिरण्यांचा अनुभव कमीत