पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५२ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध होऊं शकेल; आणि यापुढे आणखी कितीहि साक्षी झाल्या तरी त्यांच्यांतून वरील विधानांना पुष्टीचं मिळेल : विरोध होणार नाही. तथापि हा प्रश्न ३२ कोटि लोकांच्या हिताहिताचा असल्याने त्याच्यां मुळाशी जाऊन त्याचे सर्व धागेदोरे उकलले पाहिजेत आणि यां संरक्षणाच्या मागणीची कसूनः छाननी केली पाहिजे ! नाहीं तर गिरणीवाल्यांचे संरक्षण कर- ण्याच्या नादांत गिन्हाइकांच्या हिताचा बळी दिला जाण्याचा संभवः आहे. संस्थानिकांच्या हितासाठी सरकारने 'प्रिन्सेस प्रोटेक्शन बिल पास केले आणि संस्थानिक टोकेच्या मान्यांतून निर्भय झाले; पण प्रजेवर होणाऱ्या वाढल्या जुलु- माची वाट काय, याचा विचार मुळींच न झाल्यानें संस्थानिकांना प्रजेची मुस्कर्ट- दाबी करून तिला छळण्याला एक मुभा मिळाली. हिंदी गिरणीवाले हेहि एक- प्रकारचे संस्थानिकच आहेत व त्यांचें गिन्हाईक ही त्यांची प्रजा आहे. प्रजेकडून संस्थानिकांवर केव्हांहि जुलूम होऊं शकत नाही, त्याचप्रमाणे गि-हाइकांकडून गिरणीवाल्यांवर जुलूम होऊं शकत नाही. परंतु संरक्षक जकातीच्या वाढीचें शस्त्र या व्यापारी नबाबांच्या हाती दिल्यास ते त्याचा प्रयोग गिहाइकांवर करून त्यांस ‘दे माय धरणी ठाय' करून सोडतील अशी धास्ती वाटते. म्हणून असे संरक्षण- शस्त्र गिरणीवाल्यांच्या हाती देण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टींची हमी त्यांच्या- कडून मिळाली पाहिजे ते पाहू. हिंदी गिरण्यांचा धंदा सांप्रतकाळी ऊर्जितावस्थेत नसून त्याचा पाय दिवसें- दिवस घसरत जात आहे याविषयी वाद नाहीं; पण त्याला जबाबदार कोण ? आणि या दुःस्थितीतूनं हिंदी गिरण्यांना तारण्याला कोणते उपाय योजावेत ? टॅरिफ बोर्डापुढील पोपटपंची वर्गातले साक्षीदार सांगतात की, हुंडणावळीचा चढता भाव मिरण्यांच्या अधोगतीला जबाबदार आहे आणि संरक्षक जकात दुप्पट करणे हीच त्यावर तोड आहे. पण हुंडणावळीचा हा भाव गेल्या दोन वर्षातच इतका वाढला, असे असतांना चीनशीं असलेला व्यापार त्यापूर्वीच कां बुडाला असे विचारल्यास जे कोणी गिरणीवाल्यांचे वाली असतील त्यांना देखील उत्तर देतां येत नाहीं. त्याचप्रमाणे हल्लींच महर्घतेमुळे कापडाचा खप मंदावला असतांना आयात जकात दुप्पट केल्यास कापडाच्या महर्गतंत आणखी भर पडून कापडाचें गि-हाईक आजच्यापेक्षां कमीच होईल, मग त्यांत हिंदी गिरण्यांना लाभ कोणता ? असा सवाल विचारला असतां त्यालाहि समर्पक उत्तर मिळत नाही. यावरून हा प्रश्न इतका सहज सुटण्यासारखा नसून गुंतागुंतीचा आहे व त्याचा विस्तार सूक्ष्मपणेच केला पाहिजे हे सर्वांच्या निदर्शनास येईल. सर्व सत्ताधारी मॅनेजिंग एजंट्स्. हिंदुस्थानांत पहिल्या गिरणीची चिमणी उभारल्यास सुमारे ७० वर्षे झाली.