पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४६ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध रीतीनें बजाविले पाहिजे. तथापि त्यांच्या विरोधास अनुसरून कर मुळींच वाढला नाही किंवा फार तर चार-आठ आणे वाढला तरी त्यांत नोकरशाहीचा किंवा कौन्सिलरांचा मोठासा उपकार होतो असें नाहीं. एखाद्याला अन्यायानें ५० फटके मारण्याचें प्रथम ठरवून पुढे मोठ्या दयार्द्रतेनें 'जा, तुला दहाच फटक्यां- वर सोडून देतों' असे म्हणण्यांत जशी खरी दया नसून अन्यायच आहे, तसाच प्रकार मिठाच्या कराच्या संबंधांत आहे. मिठासारख्या अवश्य पदार्थावर कर ठेवणें हेंच मूळ पाप आहे. तेव्हां वस्तुतः आहे हाच कर अजीबात उठविला पाहिजे, पण तें आज साधत नसले तरी निदान तो आहे तितकाच राहावा. तो एकदम सव्वा रुपयानें वाढविण्याचा धाक घालून मग चार-आठ आणे कर वाढविण्याचे कबूल करून, त्यांत स्वतःच्या सदयतेची प्रौढी मिरविणें हा शुद्ध भोंदूपणा होय. असल्या 'तीन धूर्ताच्या' कावेबाजपणाला बळी न पडतां मतदार संघांनी ठिक- ठिकाणी प्रचंड जाहीर सभा भरवून कौन्सिलरांना असे स्वच्छ सांगावें कीं, मिठाचा कर एका पैने देखील वाढविण्यांत येऊं नये आणि हें जर तुमच्या हातून न होईल तर पुढला उपाय काय करावयाचा तो आम्ही पाहून घेऊं.. " 66 s गो-यांचे लाड; सव्वा कोटीची धाड [ माँटेग्यु-चेल्म्सफर्ड रिफॉर्म्स अमलांत आल्यावर कित्येक इंग्रज अधिकारी हिंदी मंत्र्यांच्या हाताखाली राहण्याला नाखूष होते, कित्येकांना शक्य तितक्या लवकर सेवानिवृत्त होण्याची घाई लागली होती, तर इतर कित्येकांना आपलें इतर कोणत्या तरी प्रकारानें नुकसान झालें असें वाटत होतें, अशा सर्वोची समजूत घालण्याकरितां व त्यांच्या मताप्रमाणे होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्याचा उपाय सुचविण्याकरितां 'ली' कमिशन नेमण्यांत आलें. त्या कमिशनच्या शिफारसीमुळे हिंदी खाजन्यावरील बोजा कसा वाढला त्याचें विवेचन या लेखांत आहे. ] ✔ नवा वाक्प्रचार रूढ होईल 'बाजार भरण्यापूर्वीच उचल्यांनी कंबरा बांधल्या अशी एक मराठीत म्हण आहे; तिचा अर्थ कांहीं फारसा गूढ नाहीं. स्वार्थी लोक स्वार्थ साधण्याची संधि येण्यापूर्वीच कंबर बांधून सज्ज असतात आणि पुढे येणारी संधि केव्हांहि ( केसरी, दि. ३ जून १९२४)