पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हेले गेले पण घाण गेली नाहीं २४३ कारण नाहीं असें आम्ही ता. ६ फेब्रुवारीच्या अंकांत प्रतिपादन केलें होतें व ब्लॅकेटसाहेबांसहि तो अनुभव येईलच. खर्चाच्या बाजूसहि त्यांनी बराच ढिलै- पणा दाखवून नोकरशाहीस आपला उधळेपणा चालू ठेवण्यास जागजागी सवड दिली आहे. इंचकेप कमिटीनें केलेल्या शिफारसी एकदम अमलांत आणून त्यांनीं एकोणीस कोटींची बचत केली नाहीं. कदांचित् इतक्या अल्पावधीत त्यांना प्रत्येक खात्यांतील बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष पुरविण्यास फुरसत झाली नसेल; परंतु निदान ढोबळ दोष तरी त्यांनी दूर करावयाचे होते. रेल्वेकरितां सालीना ३० कोटींचा स्वतंत्र तनखा त्या खात्यानें तोडून घेतला आहे. तथापि एका वर्षात इतकी रक्कम खर्च होत नाहीं. चालू साली तर संकल्पापेक्षां ८ कोटि खर्च कमी झाला. असे असतां पुढील सालाकरितां यंदाच्या इतकाच म्हणजे २२ कोटि खर्च मंजूर करण्याच्या ऐवजी त्यांनी ३८ कोटि खर्च करण्याला मुभा दिली; आणि इंचकेप-कमिटीनें यासंबंधांत जो नियम घालून दिला आहे तो पाळला नाहीं. लष्करी खर्चात तर वझिरिस्थानच्या मोहिमेकरितां ४॥ कोटि रुपये त्यांनी बिन- हरकत मान्य केले आहेत. आधींच लष्करी खर्चाविरुद्ध सर्वत्र ओरड चालू आहे. त्यांतून वझिरिस्थानच्या मोहिमेचा हा खर्च म्हणजे तर निवळ समुद्रांत पैसा ओतल्यासारखा आहे. गेल्या चार वर्षांच्या अनुभवानें 'लंडन टाइम्स' सारख्या साम्राज्यवादी पत्रांनीहि आतां वझिरिस्थानांतून आपलें चंबूगवाळें आटोपावें असा पोक्त सल्ला दिला आहे. इंचकेप-कमिटीनेंहि तशीच शिफारस केली आहे. असें असून नव्या फडणविसांनी काटकसरीची कात्री वझिरिस्थानच्या बजेटावर चालविली नाहीं ! कायदेकौन्सिलास लष्करी बजेटावर मत देण्याचा अधिकार असता तर फडणविसांच्या या हयगयीचे आम्हांस महत्त्व वाटले नसतें. परंतु कायदेकौन्सिलचा हात तेथपर्यंत पोचूं शकत नसल्याने ही कामगिरी सर बेसिल यांनींच करावयास हवी होती. नवीन कर टाळण्याला मोकळे असलेले दोन मार्ग हातचे घालविल्यावर जमाखर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी नवीन कर: शोधल्याविना त्यांस गत्यंतरच राहिले नाही. आणि उत्पन्नाची खात्रीची बाब म्हणून त्यांची मिठाच्या करावर दृष्टेि गेली, आणि ४॥ कोटींची तूट भरून काढण्याला आवश्यक तेवढा, म्हणजे भरपूर २॥ रुपयांचा, कर लादण्याचा त्यांनी संकल्प ठरविला. हा केवळ नागपुरी आंकडा असून त्यांत बरीच रक्कम बाद नसल्यास सर बेसिल हे या कामी अगदींच घसरले असे म्हणणे प्रात आहे. सरसाहेब नुकतेच जानेवारोंत इकडे आले आणि इकडे येण्यापूर्वी त्यांना हिंदुस्थानच्या जमाखर्चाची बिलकूल माहिती नव्हती हैं त्यांच्या भाषणावरूनच सिद्ध होत आहे. येथें आल्यानंतरचे दीड-दोन महिने त्यांनी जमाखर्चाच्या आंकड्यांची उलथापालथ करण्यांतच घालविले असले पाहिजेत. अर्थातच त्यांना हिंदुस्थानांतील मिठाच्या कराच्या चढ-उताराच