पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हेले गेले पण घाण गेली नाहीं २४१ संपन्न राष्ट्रांत कोणताहि कर वाढविला की, उत्पन्नाह तितक्याच प्रमाणांत वाढतें. पण दरिद्री हिंदुस्थानांत कराच्या आकारणीची कमाल मर्यादा उल्लंघून गेल्यामुळे त्या मर्यादेच्या पलीकडे कर वाढवितांच अर्थशास्त्रांतील 'उतरत्या पैदासीच्या ' सिद्धान्तान्वयें उत्पन्न सम प्रमाणांत न वाढतां त्याचे प्रमाण कमी कमी होऊं लागतें. याच कारणामुळे रेल्वेचे, पोस्टाचे, तारेचे व जकातीचे दर वाढविले तरी त्या त्या प्रमाणांत उत्पन्न वाढलें नाहीं. उलटपक्षी वाढत्या उत्पन्नाच्या अंदाजा- बरहुकूम वाढविलेला खर्च मात्र डोक्यावर बसला, आणि बजेटाला दिवाळ- खोरीपणाचें स्वरूप आले. गेली पांच वर्षे ही दिवाळखोरी अशीच सुरू असून तेवढ्या अल्पावधीत उत्पन्नापेक्षा खर्चाचा आंकडा १०० कोटींनी वाढला ! सर बेसिल ब्लॅकेट आपल्या बजेटांत म्हणतात, "महायुद्धापूर्वी असल्या दिवाळखोरीनें कोणाहि फडणविसाचे धाबे दणाणलें असतें आणि हा डोईजड होत जाणारा कर्जबाजारीपणा टाळण्यासाठी फडणविसांनी धडपड केली असती. परंतु महायुद्धा- पासून प्रत्येक राष्ट्राच्या जमाखर्चाची अशीच स्थिति झाली असल्यामुळे 'अतिपरि- 'चयादवज्ञा' या म्हणीस अनुसरून कोणासहि कर्जाची लाज वाटेनाशी झाली आहे ! पण असा बेफिकिरीपणा वाढणे हे सुचिन्ह नसुन त्याचा परिणाम अखेरीस सावकारांना भोगावा लागेल. पण सरकारचे सावकार म्हणजे प्रजाजनच असल्यानें सरकार आपली दिवाळखोरी झाकण्याकरितां आपल्या या सावकारांवरच नवे नवे कर लादून आणि कृत्रिम किंमतीचें नाणें आणि कागदी चलनी नोटा यांचा सुकाळ करून दुहेरी नुकसान करतें. " " गेल्या पांचसात वर्षात हिंदुस्थान सरकारचें कर्ज किती वाढले आणि कर किती चढले तें पाहिले म्हणजे सर बेसिल ब्लॅकेट यांच्या म्हणण्याचा प्रत्यय येतो. महायुद्धापूर्वी हिंदुस्थानचे राष्ट्रीय कर्ज ४०० कोटि रुपये होते आणि तें बहुतेक सर्व कर्ज रेल्वे व कालवे यांसारख्या उत्पादक कार्याकडेच खर्च झालेले असून त्यां- वरील व्याजाचा दरहि ३३ टक्केच असल्यानें तो बोजा अगदींच हलका वाटत होता. आजमितीला हिंदुस्थानचे राष्ट्रीय कर्ज ८२४ कोटि असून त्यांतलें ५५७ कोटि उत्पादक कामाकडे व बाकीचें २६७ कोटि रुपये कर्ज अनुत्पादक कामाकरितां असून कांहीं रकमांवरील व्याजाचा दर ७ टक्कयांपर्यंत चढलेला आहे. यामुळे हिंदुस्थानास केवळ व्याजाच्या पायींच ३९ कोटि रुपये भरणा करावा लागतो. यामुळे ऑजियस राजाच्या गोठ्यांतील घाण काढून टाकण्याची कामगिरी हरक्यु- लिसला जितकी अवघड गेली, तितकीच हेलेशाहींतील घाण धुवून काढण्याचीहि कामगिरी सर बेसिल ब्लॅकेट यांस कठीण जात आहे. त्यामुळे हेलेशाही गेली तरी नवें बजेट त्या घाणीनें दूषित झालेले आहेच; आणि पूर्वी होऊन गेलेल्या चुकांचा पाढा वाचणे सोपे असतें, पण स्वतः त्या चुका टाळणे तितकें स्वाधीन नसतें, याचाहि ब्लॅकेटसाहेबांस अनुभव येऊं लागला आहे.