पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४० श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध हेले गेले पण घाण गेली नाहीं [ महायुद्धाच्या समाप्तीनंतर कांहीं वर्षे युक्तप्रांताचे भाजी गव्हर्नर लॉर्ड हेळे हे हिंदुस्थान सरकारचे फडणीस म्हणून काम करीत होते. त्यांच्या कार- कीर्दीत खर्चाची वाढ बेसुमार होऊन अंदाजपत्रकांत तूट येऊं लागली व कर्जाचा बोजा वाढू लागला. त्यानंतर ही परिस्थिति सुधारण्याकरितां विलायतेहून सर बेसिल ब्लॅकेट हे हिशेची कामाचे तज्ज्ञ, फडणिसीच्या कामावर आले. इकडे येतांच त्यांनी आपलें नवें अंदाजपत्रक तयार केलें; पण एवढ्या थोड्या अवधीत आर्थिक परिस्थिति सुधारणें शक्य नसल्यानें त्यांनीहि आपल्या अंदाज- पत्रकांत पोस्टाचे, रेल्वेचे व जकातीचे दर वाढलेले कायम ठेवलेच, पण त्याशिवाय मिठाचा कर वाढविण्याचाहि आग्रह धरला. या योजनेला उद्देशून 'हेले गेले, पण चाण गेली नाहीं' हैं या अग्रलेखांत दाखविलें आहे. ] दुर्वार्ता खन्या ठरल्या , सुवार्ता नेहमीं खरी होतेच असें नाहीं, पण दुर्वार्ता सहसा खोटी ठरत नाहीं; सुस्वप्नाचा प्रत्यय येवो वा न येवो, दुःस्वप्नाचा ठोकताळा मात्र हटकून येतोच; हा जो रोजच्या व्यवहारांतला अनुभव त्याचेंच प्रत्यंतर यंदाच्या बजेटांतहि चांगले येत आहे. ता. ६ फेब्रुवारीच्या 'केसरी'त 'चालू बजेट व भावी बजेट' या मथळ्याखाली आम्ही या विषयाचा ऊहापोह करून चालू बजेटांत मोठी तूट येणार असे भाकित केले होते आणि त्यापुढे असे म्हटले होतें कीं, “ नवे फडणवीस शहाणे असतील तर ते मिठावरील कर वाढविण्याचे धाडस करणार नाहीत; यदाकदाचित् त्यांच्या हातून तशी चूक झाली तर मवाळांतले मवाळ लोकनियुक्त प्रतिनिधीहि हा कर वाढविण्याला विरोध करून ती सूचना नामंजूर करतील. या अंदाजाप्रमाणें तूट तर आली, आणि नव्या फडणविसांनी करूं नये ती चूक करून मिठाचा करराहे एकदम दुप्पट करण्याचे जाहीर केले. एतावता या दोन दुर्वार्ता खऱ्या ठरल्या; आतां लोकप्रतिनिधि या करवाढीला विरोध करून ती सूचना नामंजूर करतात की नाही, याचा अनुभव लवकरच येईल. उतरत्या पैदासीचा सिद्धान्त गतसालच्या हेलेसाहेबांच्या कच्च्या अंदाजांत आणि आतांच्या दुरुस्त अंदा- जांत इतका फरक का पडला हे समजणें कांही फारसे कठीण नाही. इंग्लंडसारख्या ( केसरी, दि. ६ मार्च १९२३