पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

19 महाराष्ट्रीय व्यापारी परिषद् २३९ पाठवावे; आणि त्यांच्या मार्फत आपल्या व्यापाराचा परदेशांत प्रसार करावा. ज्याप्रमाणे मुंबईतील व्यापारांत पारसी, गुजराथी, कच्छी, मेनन, बोहरी वगैरे व्यापाऱ्यांनी बराच मोठा भाग व्यापला आहे त्याप्रमाणे आफ्रिका, इराण, मेसो- पोटेमिया, चीन, सयाम, सिलोन वगैरे देशांशी होणाऱ्या हिंदी व्यापाराच्या एजन्सीचाहि बराच मोठा भाग त्यांनी आपल्या एजंटांमार्फत हस्तगत केला आहे. या किफायतीच्या जिवंत झन्यांतले थोडेबहुत जीवन आपल्या हाती मिळवून घेऊन स्वतःची व्यापारी तृष्णा शांत करण्याकरितां डेक्कन मर्चेंट्स ॲसोसिएशननेंहि स्वतःचे कावडीवाले ठिकठिकाणी विखुरले पाहिजेत. आजमितीला परदेशांत जाण्याला उत्सुक असलेल्या बुद्धिवान् व धाडसी तरुणांची उणीव भासणार नाही. मात्र त्यांना तिकडे रवाना करण्यापूर्वी त्यांस व्यापारी शिस्तीचें वळण लावून दिले पाहिजे. अशा रीतीनें महाराष्ट्रीय व्यापारी परिषदेने हाती घेण्याजोगी अनेक कार्ये असून त्यासंबंधानें परिषदेत चर्चा झाल्यावर डेक्कन मर्चेंट्स ॲसोसिएशननें वर्षभर पुढे चालविण्यासारखी कामेहि अनेक आहेत. त्यांतून परिषदेंत जीं जी कामे तूर्त हाती घेण्याचा विचार बहुमतानें ठरेल तीं ती कामें पुढे वर्षभर डेक्कन मर्चेंट्स ॲसो- सिएशन चालू ठेवील यांत शंका नाही. तथापि त्या संस्थेला तें कार्य करण्यास उत्ते- जन येण्याला व्यापारी परिषदेस मुंबई शहरांतील आणि सर्व महाराष्ट्रांतील दक्षिणी व्यापाऱ्यांची शक्य तितकी सक्रिय सहानुभूति मिळाली पाहिजे. यास्तव परिषदेचें महत्त्व जाणून ठिकठिकाणच्या दक्षिणी व्यापारी मंडळींनी आपले प्रतिनिधि पाठ- वून आणि निबंधद्वारा आपले विचार कळवून परिषदेच्या कार्यास साहाय्य करावें. परिषदेला श्रीमंत पंतप्रतिनिधींसारखे आपल्या संस्थानच्या उद्यमाभिवृद्धयर्थ अद् र्निश झटणारे अध्यक्ष सुदैवेकरून लाभले आहेत. त्यांचा व त्यांच्या संस्थानांतील तज्ज्ञांचा पोक्त सल्ला या कामी मिळेलच. त्याचा योग्य निष्कर्ष काढून महाराष्ट्रीय व्यापारी मंडळींनी आणि डेक्कन मर्चेंट्स ॲसोसिएशनने त्यास अनुसरून आपले धोरण आंखावें. म्हणजे आज जो दक्षिणी गृहस्थांचा व्यापाराच्या टापूंत अत्यल्प क्षेत्रांत कसाबसा प्रवेश होत आहे तो यापुढे सर्वत्र सुलभ प्रवेश होईल; आणि दक्षिणी व्यापारी इतर व्यापायांच्या जोडीनें मुंबई इलाख्यांतील व्यापाराची, विशेषतः देशी कारखान्यांतील मालाची, उलाढाल करूं लागतील.