पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३८ श्री. ज. स. करंदीकर यांच निवडक लेख व निबंध होऊन खर्चाचीहि काटकसर करता येईल. याकरितां महाराष्ट्रीय व्यापारी परिषदेनें दक्षिणी व्यापायांच्या सोयीकरितां संघशक्तीनें असल्या सर्व प्रकारच्या साधनांची तरतूद करावी. लो. टिळक टेक्निकल लायब्ररीला जोडूनच स्वदेशांतील व पर देशांतील विविध कारागिरीच्या यंत्रांचे छोटे नमुने जर ठेवून दिले तर नवीन कार खाने काढू इच्छिणाऱ्यांना यंत्राची माहिती होईल, आणि ज्याला साधन असेल तो तसली यंत्रे आणवून कारखाना उभारूं शकेल. परदेशांतून येणाऱ्या प्रत्येक वस्तू- संबंधानें ती कोणत्या देशांत होते, तिला कच्चा माल कोणता लागतो व तो कोठें पैदा होतो, तिला पक्कया मालाचें रूप देण्याला यंत्रसामुग्री किती लागते, ती यंत्रे कोणत्या देशांत तयार होतात, त्यांना किंमत काय पडते आणि या यंत्रावर रोजचा माल किती तयार होतो इतकी सविस्तर माहिती डेक्कन मर्चेंट्स ॲसोसिएशनच्या सभासदांस केव्हांहि उपलब्ध असली पाहिजे. बँक काढणें व भांडवल पुरविणें ही कार्ये जोखमीची व कालांतराने होणारी असली तरी 'टेक्निकल लायब्ररी' वाढ- विणें आणि मशिनरी-मॉडेल्स् म्यूझिअम स्थापन करणे व्यवहार्य आहे; आणि मदा- राष्ट्रीय व्यापारी परिषदेने पहिल्याप्रथम हेच कार्य आपल्या शिरावर घ्यावें. नवे कारखाने उभारणें आणि परदेशी मालाच्या तोडीचा व किंमतीत स्वस्त असा माल तयार करणें हें भांडवलाच्या अभावी दिनावधीवर पडले तरी, विद्यमान देशी कारखान्यांतील मालाचा खप देशांत जारीने सुरू करण्याकरितां विशिष्ट मालाची सोल एजन्सी घेणे आणि आपल्या सभासदांमार्फत प्रांताप्रांतांतून पोट एजन्सीज स्थापन करणें हें कार्य डेक्कन मर्चेंट्स ॲसोसिएशनला अल्पावधीत साध्य होईल. या एजन्सीच्या व पोट-एजन्सीच्या जोरावरच या ॲसोसिएशनला महाराष्ट्रांत आपले जाळे पसरून कार्याचा पसारा वाढवितां येईल आणि सभा- सदांची संख्या वाढवून द्रव्यबलहि संपादन करता येईल. परदेशांत एजन्सीज स्थाप परदेशांत शिक्षण संपादण्याकरितां शिष्यवृत्त्या देण्यासाठी फंड जमवावा असाहि परिषदेचा उद्देश असल्याचें तिच्या प्रसिद्ध झालेल्या दिसून येतें. परंतु हें कार्य अत्यंत खर्चाचे असून शिवाय व्यापारी संस्थेनें तें अंगावर घेण्याच्या लायकीचें नाहीं. असली कामगिरी या संस्थेनें स्वतःकडे न घेतां 'हिंदु एज्युकेशन' फंडासारख्या संस्थेकडेच ती सोंपवून द्यावी; मात्र त्या फंडाला या संस्थेनें द्रव्यद्वारा साहाय्य केल्यास त्याच्या मोबदला आपले विद्यार्थी निवडून पाट विण्याचा अधिकार तिनें स्वतःकडे घेऊन ठेवावा; म्हणजे विशिष्ट विषयांतील तज्ज्ञ या देशांत दुष्प्राप्य असल्यास ते तयार करून आणण्याचें साधन संस्थेच्या हातीं। राहील. विद्यासंपादन करण्याकरितां परदेशी विद्यार्थी रवाना करण्यापेक्षां या संस्थेनें आपले लायक व्यापारी एजंट परदेशांत जाऊन स्थायिक राहण्याकरितां