पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ लेला आहे. स्वराज्याच्या चळवळीतला हा शेवटचा टप्पा होय. या निवडणुकी जिंकून बहुमत मिळविल्यास प्रांतिक सत्ता पूर्णपणे हातांत येणार होती. बारा वर्षा- पूर्वी मंत्रिमंडळें बनवावीं का नाही हा जो वाद निघाला होता, त्याचा योग्य निर्णय त्या वेळी केला गेला नाही म्हणून चळवळीची निष्कारण कुचंबणा झाली. या वेळींहि तीच चूक केल्यास, नोकरशाहीवर मात करण्याची संधि जाऊन उलट नोकरशाही- कडून तुमच्यावर मात केली जाईल व तुम्हांस नोकरशाहीच्या जोखडाखाली बराबावे लागेल, असा अगाऊ इशारा या लेखाने दिला आहे. आर्थिक व्यवहार येथून पुढें ‘आर्थिक व्यवहार' हें तिसरें प्रकरण सुरू झालें. पूर्वीच्या दोन प्रकरणांत जशी एकसूत्रता आहे, आणि क्रमाक्रमाने एकेक टप्पा गांठलेला आहे, तसा क्रम या लेखांत असणे शक्य नाहीं. ज्या ज्या वेळी महत्त्वाचा आर्थिक प्रश्न उद्भवला त्या त्या वेळी त्यावर केसरीने आपले मत प्रदर्शित केले आहे. त्यांतले कांहीं लेख तीसपस्तीस वर्षापूर्वीचे असले तरी आजमितीलाहि त्यांपासून कांहीं बोध घेण्यासारखा असल्याने त्या लेखांचें पुनर्मुद्रण या लेखसंग्रहांत केले आहे. पहिला लेख सर चुनीलाल सरैय्या यांचा कोंडमारा कसा झाला त्याच्या स्पष्टीकरणार्थ लिहिलेला आहे. त्या लेखावरून त्या वेळी सरकार ब्रिटिश कंपन्यांच्या रक्षणासाठी हिंदी कंपन्यांची कशी अडवणूक करीत असे व त्या वेळी स्वदेशी बँक चालविणें किती अवघड होते ते दिसून येईल. पहिल्या स्वदेशी बँकेसाठीं सरैय्या यांचा .बळी पडला तरी तो धंदा आतां सुप्रतिष्ठित झाला याचें श्रेय सर चुनीलाल सरैया यांच्या धाडसासच आहे. कालवे का रेल्वे या दुसऱ्या लेखांत हिंदुस्थानच्या हितासाठी काल- ब्यांची वाढ करणे आवश्यक असतां ब्रिटिश कंपन्या आणि गोरे बड़े अधिकारी यांच्या फायद्यासाठी सरकार रेल्वेकडेच अमूप पैसा कसा खर्च करतें, हैं दाखविलें आहे. करांचा पूर्वेतिहास हा तिसरा लेख ऐतिहासिक माहितीचा आहे. पूर्वी या देशांत कोणते कर, केव्हां, कोणत्या उद्देशानें बसविले, त्या करांत जे फेरबदल वारंवार झाले ते सगळे ब्रिटिश व्यापाऱ्यांच्याच हिता नजर कसे झाले याचें विवरण, अप्रसिद्ध जुनी माहिती देऊन, या लेखांत केलेले आहे. कर वाढवावयाचे तर हे वाढवा या चवथ्या लेखांत अर्थशास्त्रांची मूलतत्वें आणि लोकहित या दोहोंचा मेळ घालून कोणते कर वाढवावेत व कोणते वाढवुं नयेत याविषयीं ज्या सूचना केल्या आहेत त्या आजच्या सरकारलाहि उपयुक्त चाटण्यासारख्या आहेत. चलन बेसुमार वाढलें कीं महागाई वाढावयाचीच, असा अर्थशास्त्रांतला सिद्धान्तच आहे व त्या सिद्धान्ताचा अनुभव पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस कसा आला याचें विवेचन नोटांचा सुकाळ आणि महर्घता या ५ व्या लेखांत केले आहे.