पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ग २६० ४४ २५ आहे. बार्डोलीचा सत्याग्रह यशस्त्री झाला म्हणून तेथील शेतसाऱ्यांची चुकीची वाढ कमी करण्यांत आली, पण अशाच चुका इतर अनेक ठिकाणी झाल्या आहेत • त्यांची वाट काय असा खोचक प्रश्न सरकारला विचारण्याकरितां 'एक बार्डोली मिटली पण इतरांची वाढ काय ' हा १२ वा लेख यांत घेतला आहे. फुटकळ सत्याग्रहानें स्वराज्य साध्य होत नाहीं असे पाहून गांधीजींनी मिठाचा सुप्रसिद्ध सत्याग्रह जाहीर केला आणि देशभर चळवळ करण्याला आवाहन केले, तेव्हां त्या आवाहनाला अनुरूप असा ' 'सत्याग्रहाच्या युद्धाचा रणदुंदुभि वाजूं लागला' असा मथळा दिलेला हा १३ वा लेख यांत समाविष्ट केली आहे. ही सत्याग्रहाची चळवळ देशभर जोरानें फोफावली. तींत क्वचित् ठिकाणीं गुंडांनी अत्याचारहि केले. असा एक भीषण अत्याचार सोलापुरास घडला. तें निमित्त पुढे करून सर्वत्र दहशत बसविण्याकरितां सोलापूरच्या खटल्यांतील चौघा आरोपींना देहान्त शिक्षा सुनावून फांसावर टांगण्यांत आले. या आरोपींचे जीव बचावण्याकरितां अर्ज, विनंत्या, शिष्टाई इत्यादि सर्व उपाय केलेले अगदीं व्यर्थ ठरले, त्यावरून अद्यापि नोकरशाही वठणीवर येत नाहीं, तिला वठणीवर आणण्याकरितां “बेजबाबदार नोकरशाही व दुबळें लोकमत' हा चौदावा लेख लिहिलेला आहे. 'कराचीच्या गोळीबाराची मीमांसा' हा लेख अगदी निराळ्या स्वरूपाचा आहे. स्वराज्याच्या चळवळीच्या टप्प्यांतला हाटप्पा नव्हे. या लेखांत कराचीच्या अधिकाऱ्यांनी आडदांड मुसलमानांवर केलेल्या गोळीबाराचें समर्थन केलेले आहे. हा लेख या संग्रहांत घेण्याचा हेतु एवढाच कीं, स्वराज्य असो वा परराज्य असो, आपल्या मुलुखांत शांतता राखावयाची असेल आणि बेफाम अत्याचारी गुंडांपासून निरुपद्रवी जनतेचें संरक्षण करावयाचें असेल तर असे कडक उपाय योजावे लागतात. 6 C निजामानें वहाडांत आपले हक्क कसे प्रस्थापित करून घेतले व मागील अपमानाचें कसें उहें काढून घेतलें तें दर्शविण्याकरितां 'सव्याज वचपा काढून घेतला ' हा १६ वा लेख दिला आहे. वाटाघांटी करून आपले स्थान बळकट कर `ण्यांत निजाम किती धूर्त आहे, व त्याच्याशीं वाटाघाटी करावयाच्या तर किती जपून कराव्या लागतात तें या लेखावरून दिसून येईल. लॉर्ड कर्झन यांनी १९०२ सालचा करार करून घेऊन सध्यांच्या निजामाच्या वडिलांना चांगलेच चकविलें. त्यानंतर १९२६ साली लॉर्ड रीडींग यांनी सध्यांच्या निजामाची दुरहर, बिलकूल भीडभाड न धरतां सपशेल झिडकारून, बंद पाडली. तरी पण सर सॅम्युएल होअर- सारखे बोटचेपे भारतमंत्री अधिकारारूढ असल्याची संधि साधून निजामानें आपला कावा साधला आणि वाडांत यथेच्छ हातपाय पसरण्याची मुभा मिळविली. या प्रकरणांतला शेवटचा १७ वा लेख 'राबविणार का राबविले जाणार ' हा असून तो लेख १९३७च्या प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुकीच्या वेळी लिहि-