पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाराष्ट्रीय व्यापारी परिषद २३७ होतकरू व्यापायांचा मार्ग सुगम होतो. दक्षिणी व्यापाऱ्यांस सर्वच गोष्टी प्रतिकूल. 'ना भांडवलं, ना पत, ना अनुभव, ना ओळख; सगळाच नन्नाचा पाडा !' ही स्थिति सुधारून होतकरू दक्षिणी व्यापाऱ्यांचा व्यापारांत शिरकाव कसा होईल, याचा विचार महाराष्ट्रीय परिषदेनें मुख्यतः केला पाहिजे. भांडवल कसे मिळेल ? महाराष्ट्रीय व्यापारी परिषद भरविण्यांत जे अनेक उद्देश आहेत त्यांत उत्पादक धंद्यांना खेळते भांडवल पुरविण्याकरितां सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक स्थापणें हाहि एक उद्देश नमूद आहे. नवीन होतकरू कारखानदाराच्या तात्पुरत्या गरजा भागविण्यापुरतें भांडवल यांस मिळण्याची सोय झाली तर मोठेंच कार्य झाल्याप्रमाणे होईल. परंतु हे साध्य होण्याला बँकेचें मांडवल मोठे पाहिजे, आणि त्या बँकेत दीर्घकालीन मुदतीच्या ठेवीहि मोठ्या प्रमाणांत आल्या पाहिजेत. एवढी उभारणी होईपर्यंत तूर्त डेक्कन मर्चंट्स ॲसोसिएशनच्या क्रेडिट सोसायटीचें भांडवल वाढून यांतून त्या संस्थेच्या सभासदांस मदत करण्यांत यावी. मोठ्या प्रमाणांत भांडवल जमविण्याकरितां टाटा इंडस्ट्रिअल बँकेप्रमाणे बँक स्थापन करण्याचे ध्येय डोळ्यापुढे ठेवावें, पण ते जर लवकर अमलांत न येईल तर लाइफ इन्शुअरन्स करणाऱ्या कंपनीची स्थापना करून त्यांतून नवीन कायद्यान्वयें जेवढे भांडवल इकडे उपयोगांत आणतां येईल तेवढे आणावें. हल्ली मुंबई इलाख्यांत दक्षिणी लोकांनी चालविलेली सातारची 'वेस्टर्न इंडिया लाइफ अॅशुअरन्स' एवढीच काय ती आयुष्याचा विमा उतरणारी कंपनी आहे. अशा कंपन्यांच्या अभावी महाराष्ट्रीयांना परप्रांतीय कंपन्यांचाच आश्रय घ्यावा लागतो. तेव्हां तशी एखादी मोठ्या प्रमाणावर विमा कंपनी स्थापन केल्यास महाराष्ट्रीयांची अडचण दूर होईल आणि व्यायांसह तिजपासून भांडवलाचें साहाय्य मिळू शकेल. यंत्रांच्या प्रदर्शनापासून प्रारंभ भांडवलाच्या अभावाखेरीज इतर ज्या कांही उणीवा आहेत त्या दक्षिणी व्यापाऱ्यांस इतरांपेक्षां लवकर आणि थोड्या परिश्रमानें दूर करतां येतील. महाराष्ट्रीय व्यापारी वर्ग इतरांच्या मानानें अधिक सुशिक्षित असल्याकारणानें त्याला परराष्ट्रां- तून ज्ञानविज्ञान संपादन करणे, रोजच्या रोज नवीन लागणाऱ्या शोधाचा फायदा घेणें, नवीन तऱ्हेची व किफायतशीर अशीं यंत्रें जेथें मिळतील तेथून आणविणे वगैरे गोष्टींचा फायदा इतर व्यापायांपेक्षा कमी श्रमानें घेतां येईल. त्याचप्रमाणे या देशां- तील व परदेशांतील व्यापार व उद्योगधंदे यासंबंधी चालू वाङ्मय वाचन आणि ठिकठिकाणचीं प्रदर्शनें पाहून, परिषदांना हजर राहून, त्यांना आपल्या ज्ञानांत वारंवार भर टाकून ते ताजें राखतां येईल. परंतु या गोष्टीहि एकट्यानें स्वतःच्या ऐपतीप्रमाणें करीत राहण्यापेक्षां संघामार्फत झाल्यास यांत वेळेचा अपव्यय कमी .