पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३६ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध आमच्या संस्थानिकांत उद्योगधंद्याकडे लक्ष देणारे व त्यांच्या अभिवृद्धीसाठी सतत झटणारे संस्थानिक कचितच आढळतात. पण श्रीमंत बाबासाहेब मिरजकरांप्रमाणे श्रीमंत औंधकरांचेंहि या कार्याकडे पूर्वीपासूनच लक्ष आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक कारखानदारांना आपल्या संस्थानांत आश्रय दिला असून, शिवाय खुद्द औंध येथें एक रासायनिक प्रयोगशाळा स्थापून तींत औद्योगिक व व्यापारीदृष्टया महत्त्वाचे शोध लावण्याची सोय करून ठेविली आहे आणि तिचा त्या संस्थानच्या • प्रजाजनांना मोठा उपयोगहि होत आहे. अशा रीतीने श्रीमंत पंतप्रतिनिधींच्या ठायीं संपत्ति, सत्ता व सक्रिय सहानुभूति यांचा त्रिवेणीसंगम झाला असल्यानें त्यांच्या अध्यक्षत्वाखाली ही परिषद यशस्वी रीतीनें पार पडेल यांत संशय नाहीं. तथापि ज्या महाराष्ट्रीय व्यापारी वर्गाच्या हिताकरितां हा सारा खटाटोप करण्यांत येत आहे त्या व्यापारी वर्गाच्या दूरदर्शी प्रतिनिधींनी यांत उत्सुकतेनें भाग घेतला तरच हा कार्यक्रम खरा कार्यकारी होऊं शकेल. दक्षिणी समाजांत आवी सर्वच बाबतींत औदासीन्य दिसून येतें. त्यांतहि त्यांच्यांतून वाणिज्यवृत्तीचा लोप होऊन कित्येक शतकें लोटली आहेत, व आजमितीला महाराष्ट्रांतील बहुतेक सर्व व्यापार महाराष्ट्रेतर वैश्य वर्गाने आटोपला आहे. यामुळे दक्षिणी व्यापारी मंडळीतील महत्त्वाकांक्षाच नष्टप्राय झाली असून, महाराष्ट्रेतर व्यापारी वर्गाकडून जो कांहीं थोडाबहुत व्यापाराचा वांटा आपल्या हाती दिला जाईल तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याइतकी त्यांची वृत्ति परावलंबी बनली आहे. कोणत्याहि व्यापाराच्या, कार- खान्याच्या किंवा उद्योगधंद्याच्या मुळाशी हात घालण्याचे धाडसच त्यांस करवत नाहीं. असली पंगूपणाची व परोपजीवी वृत्ति बदलून योग्य महत्त्वाकांक्षेचें वारें अंगांत खेळू लागण्यास आमच्या या व्यापारी बंधूंनी व्यापारी उलाढालीच्या उगमस्थानांत, म्हणजे मुंबापुरीत, एकत्र जमून विचारविनिमय करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रीय लोकांतून वैश्य वृत्तीची परंपरा कित्येक शतकांपासून लुप्त झाल्याकारणानें आजमितीला दक्षिणी व्यापायांस डोके वर काढणे कठीण झाले आहे. इतर अनेक अडचणी आहेतच, पण त्यांत भांडवलाची अडचण ही मुख्य होय. नवीन हत्ती धरण्याला ज्याप्रमाणे शिकविलेले पाळीव हत्ती जवळ असावे लागतात, त्याप्रमाणे नवी संपत्ति मिळविण्याला प्रथम थोडें तरी घरचें भांडवल लागतें, या अर्थाचें जें आर्य चाणक्याचें बचन शिरोभागी दिले आहे तें अक्षरशः खरे आहे. पारसी, गुजराथी, वाणी, मारवाडी, बोहरी, कच्छी वगैरे जातींतील तरुण व होतकरू व्यापाऱ्यांना स्वतःच्या घरचें भांडवल असतें; वडिलांनी कम विलेला नांवलौकिक आणि जोडलेले स्नेहसंबंध त्यांच्या उपयोगी पडतात; घरच्या पेढीवर किंवा दुकानावर आणि ममताळू आतांच्या नजरेखाली प्रत्यक्ष व्यावहारिक शिक्षण लाभलेले असतें; आणि जेथें घरचें भांडवल नसेल तेथें त्याला मुंबईतील स्वजातीय बज्या व्यापाऱ्यांकडून बरीच सवलत मिळते. यामुळे त्या जातींतील